आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Chief Justice V.B.Palashikar Speaking In Press Conference

अंतर्गत वादातून न्यायमूर्तींवर गंभीर स्वरूपाचे आरोप- व्ही.बी.पळशीकर यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- न्यायाधीश गांगुली, स्वतंत्रकुमार यांना पदावरुन हटवण्यासाठी न्यायव्यवस्थेतील अंतर्गत वाद हा कारणीभूत आहे.या आरोपांमुळे नुसते गांगुलीच बदनाम न होता पूर्ण न्यायव्यवस्थाच बदनाम झाली आहे असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश व्ही.बी.पळशीकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

पळशीकर म्हणाले, गांगुली प्रकरणाला प्रसिद्धीमाध्यमांनी फार हवा दिली. आरोप करण्याचा अंतर्गत हेतू हा वेगळा असू शकतो. सुशिक्षित मुलगी वर्षभर गप्प का बसली? न्यायव्यवस्थेच्या निर्णयांमध्ये नेहमीच राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेत आतापर्यंत 104 बदल सुचवणारे आदेश दिले आहेत.

न्यायालयाने सुचवलेल्या बदलांच्या नेमके विरोधात राजकारण्यांनी कृती केली. पन्नास टक्के कायदे न्यायालयीन निकालाच्या विरोधात करण्यात आले. विशाखा निर्णयानंतर 16 वर्षांनी कायदा झाला. तो कायदा सोळा दिवसात कसा अंमलबजावणीत येईल? असा सवालही त्यांनी केला. लैगिंक शोषण विरोधी नवीन कायद्याचा गैरवापर शहरांसारख्या ठिकाणी नक्कीच होऊ शकतो. त्यातुन थोडासा अन्याय झाला तर समाजहितासाठी तो सहन करावा. सगळ्याच तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी झाली तर सामान्य नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी त्रास होणार नाही. सध्या ते होताना दिसत नाही. ब्रिटीशांच्या काळातील कायद्यांचे नियम हे कितपत योग्य आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आयएलएस कॉलेज प्रथम
न्यू लॉ कॉलेजकडून घेण्यात आलेल्या चौथ्या राज्यस्तरीय मूट कोर्ट स्पध्रेत पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजने प्रथम क्रमांक मिळवला, तर पुण्याच्याच नवलमल फिरादिया लॉ कॉलेजने दुसरा क्रमांक पटकावला. धुळ्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजने तृतीय क्रमांक पटकावला.

न्यू लॉ कॉलेज व मूट कोर्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित चौथ्या राज्यस्तरीय मूट कोर्ट स्पर्धेत पुणे येथील इंडियन लॉ कॉलेजने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या संघास पारितोषिक देताना मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश व्ही. बी. पळशीकर