आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी न्यायमूर्ती संभाजी पाटील म्हसे यांचे निधन, राज्य मागासवर्गीय आयोगाचे विद्यमान अध्यक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती संभाजी म्हसे (७२) यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने औरंगाबादेतील रुग्णालयात निधन झाले. रविवारी सकाळी नगरच्या अमरधाममध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी अॅड. दीपलक्ष्मी म्हसे, दोन मुली, भाऊ अॅड. विवेक म्हसे असा परिवार आहे. 
 
एमजीएम रुग्णालयात पंधरा दिवसांपूर्वी उपचारांनंतर त्यांना घरी सोडण्यात आले. दोन दिवस घरी थांबल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली होती. मूळचे नगरचे रहिवासी असलेल्या म्हसे यांनी वकिली करत नंतर औरंगाबाद आणि मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले. निवृत्तीनंतर ते ग्राहक मंचाचे अध्यक्ष होते. 
बातम्या आणखी आहेत...