नगर- स्नेहालय संचलित स्नेहाधारमध्ये नुकताच माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला. एमआयडीसीतील पुनर्वसन संकुलात झालेल्या या मेळाव्यास अनेक माजी विद्यार्थ्यांनी
आपल्या कुटुंबासह हजेरी लावली.
स्नेहालयाच्या माध्यमातून समाजाने आपले जीवन उभे केले, आता समाजातील आपल्याच वंचित बंधू-भगिनींना मदत करून समाजाचे ऋण फेडण्याची भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. स्नेहालयाचे सचिव राजीव गुजर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या नात्यांची घनिष्टता, ऋणानुबंध, तसेच आपलेपणा माणसामध्ये कसा रुजतो हे संजय बंदिष्टी यांनी त्यांच्या शालेय जीवनातील उदाहरणातून सांिगतले. अॅड. श्याम आसावा म्हणाले, विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या काही अडचणी असतील, तर त्या सोडवण्यासाठी स्नेहालयातील सदस्य नेहमीच प्रयत्न करतील. नोकरी व विविध प्रशिक्षणासाठी स्नेहालयाच्या वतीने मदत करण्यात येईल, असे आसावा यांनी सांिगतले. विकास पाटील, विकास गवळी, श्रुती कुंभार, करुणा भंडारी, अंजू डाबी आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी शिल्पा केदारी, रत्ना शिंदे, अनुपमा मुंडे, आरती गायकवाड, कृष्णा पाडवी, मनोहर, कलुंजे, पूजा गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.