आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधी मैदान झाले किल्लेमय...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शिवनेरी, तोरणा, रायगड, चांदबिबी महाल, कोंढाणा, प्रतापगड, देवगिरी, काल्पनिक देवगिरी या किल्ल्यांमुळे गांधी मैदान परिसरातील वातावरण शुक्रवारी किल्लेमय झाले होते. निमित्त होते दिवाळीनिमित्त युवासेनेतर्फे गांधी मैदानावर शुक्रवारी किल्ले बनवा स्पर्धेचे.

स्पर्धेत पंच्चान्नव किल्ले बनवले. संयोजकांनी किल्ले बनवण्यासाठी माती उपलब्ध करून दिली. दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत किल्ले बनवण्यात बालचमुंसह युवक, युवती मग्न झाली होती.

र्शीकांत बेडेकर व प्राध्यापक मकरंद खेर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचे उद्घाटन झाले. आमदार अनिल राठोड, महापौर शीला शिंदे, युवासेनेचे अध्यक्ष विक्रम राठोड, शहरप्रमुख संभाजी कदम, अनिल शिंदे, विकी इंगळे, शांताराम गहिले, निखिल ओगले, गणेश झिंजे आदी उपस्थित होते. आमदार राठोड म्हणाले, शिवाजी महाराजांचा इतिहास जनतेपर्यंत पोहचण्यासाठी अशा स्पर्धांचा उपयोग होईल. स्पर्धेत लहान मुलांसह युवक व युवतींनी पंच्चान्नव किल्ले बनवले. संयोजकांनी किल्ले बनवण्यासाठी माती उपलब्ध करून दिली. विक्रम राठोड म्हणाले, महाराष्ट्राचा इतिहास किल्ल्यांमार्फत नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बक्षीस वितरण रविवारी (10 नोव्हेंबर) जिल्हा वाचनालयात होणार आहे. अनामिका रणनवरे, रिया रणनवरे, यश सुमंत, स्नेहल पानसंबळ, वर्धन सुमंत यांनी टाकाऊ वस्तूंपासून काल्पनिक देवगिरी किल्ला बनवला. झुलता पूल व शिवाजी महाराज हे या किल्ल्याचे खास आकर्षण ठरले.