आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीरामपूरमध्‍ये वाहनचालकांना लुटणार्‍या टोळीतील चौघांना अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर - शहरातील वाकडी रस्त्यावर एमआयडीसी परिसरात वाहनचालकांना लुटणार्‍या टोळीतील चारजणांना शनिवारी रात्री शहर पोलिसांनी अटक केली. बाळासाहेब गांगुर्डे (22, श्रीरामपूर), संदीप शिंदे (19, शिरसगाव शिवार), राबब्रिज यादव (19, श्रीरामपूर), सुभाष ऊर्फ गुड्ड पंडित (24, खंडाळा) अशी आरोपींची नावे आहेत.

खबर्‍याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली. हे आरोपी शहरातील एमआयडीसी परिसरात वाकडी रस्त्यावर वाटसरूंना आडवून त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून मारहाण करत लुटायचे. अशा दोन गुन्ह्यांची कबुली या आरोपींनी दिली. तपासात आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एका मोठय़ा टोळीचा पर्दाफाश झाला आहे. चौघा आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता 17 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

हरिण बाळगल्याप्रकरणी एकास अटक

बेकायदा हरिण बाळगल्याबद्दल शनिवारी रात्री पोलिसांनी एकास अटक केली. संदीप वाघमारे (22, खंडाळा)असे आरोपीचे नाव आहे. वाघमारे याच्या घरात नर जातीचे हरिण आढळून आले. बेकायदा हरिण बाळगल्याप्रकरणी वाघमारेविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. हरणाला कोपरगाव येथील वन अधिकार्‍यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.