आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवरा नदीपात्रात पुलाखाली सापडले चार तोफगोळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे - प्रवरा नदीवरील पुलाखाली आठ इंच लांब पाच इंच व्यासाचे गंजलेले चार तोफगोळे रविवारी सायंकाळी सहा वाजता सापडले. पुलाच्या दुसऱ्या गाळ्याखाली विनोद कराडे यांना हे तोफगोळे दिसले. ही माहिती पोलिसांना समजताच त्यांनी लगेच नदीपात्राकडे धाव घेतली. सध्या पात्रात वाहते पाणी नाही. एका डबक्यात हे चार लोखंडी तोफगोळे होते. पोलिस निरीक्षक संपत शिंदे पथकाने हे तोफगोळे ताब्यात घेतले. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी लगेच बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पाठवले.
बातम्या आणखी आहेत...