आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोसपुरीत रंगले स्नेहमिलन, दैनिक दिव्य मराठीचा चौथा वर्धापनदिन साजरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: स्नेहमिलन कार्यक्रमात बोलताना दिव्य मराठीचे संपादक दीपक पटवे.
नगर - दैनिक दिव्य मराठीने रविवारी सकाळी घोसपुरी गावात आपला चौथा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. दरवर्षी शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या पानसुपारीच्या कार्यक्रमाला फाटा देत घोसपुरीसारख्या टंचाईग्रस्त गावात हा सोहळा पार पडला. हजारो ग्रामस्थांसह जिल्हाभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या सोहळ्यास हजेरी लावली. घोसपुरीसह परिसरातील ग्रामस्थांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी ग्रामस्थांचे प्रबोधन केले.

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून दरवर्षी शहरात पार पडणाऱ्या पानसुपारीच्या कार्यक्रमास यंदा फाटा देण्यात आला. त्याऐवजी दुष्काळी नगर तालुक्यातील घोसपुरी गावात ग्रामस्थांबरोबर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात अाला. या अनोख्या सोहळ्यास ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. याप्रसंगी जिल्हाधिकारी कवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, खासदार दिलीप गांधी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, "दिव्य मराठी'चे संपादक दीपक पटवे, सरव्यवस्थापक शैलेश पाटील, ब्युरोचिफ मिलिंद बेंडाळे, जाहिरात व्यवस्थापक नीलेश सोनवणे, वितरण व्यवस्थापक प्रमाेद गायकवाड, नगर प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सूर शेख, पंचायत समितीचे माजी सभापती अशोकराव झरेकर, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, घोसपुरीच्या सरपंच नासिरा तांबोळी, उपसरपंच प्रभाकर घोडके, पोलिस पाटील किसन पारधे, घोसपुरी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष सुनील ठोकळ, उपाध्यक्ष भाऊसाहेब घोडके, दत्तात्रेय झरेकर, अशोकराव हंडोरे, प्रदीप झरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळी १० वाजता रंगकर्मी देविप्रसाद सोहोनी यांचा 'आता कशाला उद्याची वाट?' हा एकपात्री प्रयोग झाला. या प्रयोगानंतर जिल्हाधिकारी कवडे यांचे भाषण झाले. ते म्हणाले, आपण देवाजवळ नेहमी काही ना काही मागतो, परंतु आपण काय करणार याचा सर्वांनाच विसर पडतो. देवाच्या दारातून आपण सत्यवचन, प्रामाणिकपणा घेऊन गेलो पाहिजे. समाजात खोटेपणा, व्यसने, द्वेष, मत्सर यांचे प्रमाण वाढले आहे. विकासापेक्षा माणसातील विचार बदलणे महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे मोठे रस्ते होतात, तसेच माणसांचे मनही मोठे झाले पाहिजे. प्रामाणिकपणा, एकमेकांवरील प्रेम, सचोटी यासारखे गुण वाढवण्याचे विषय ग्रामसभेच्या अजेंड्यावर आले पाहिजेत. टीव्ही, मोबाइलपासून दूर राहून आपल्या मुलांसाठी जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून उन्नती साधली पाहिजे. व्यसनमुक्तीसाठी सर्वांनी एकत्र येऊन लढले पाहिजे. प्रत्येक गावात स्त्री जन्माचे स्वागत उत्साहात झाले पाहिजे. असा विविध विषयांबाबत कवडे यांनी ग्रामस्थांचे प्रबोधन केले.

घोसपुरीच्या विकासासाठी प्रयत्न : पटवे
'दिव्यमराठी'वर लाखो वाचकांनी मनापासून प्रेम केले. 'दिव्य मराठी'चा वर्धापन दिन घोसपुरीसारख्या टंचाईग्रस्त गावात साजरा होत आहे, याचे मोठे समाधान आहे. या गावाच्या विकासासाठी "दिव्य मराठी' पुढाकार घेणार आहे. वर्षभरात येथील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न करणार असल्याचे 'दिव्य मराठी'चे संपादक दीपक पटवे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

पटवे म्हणाले,'दिव्य मराठी'ने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली. दुष्काळात होरपळलेल्या मराठवाड्याला मदत करणे हे कर्तव्य समजून तब्बल तीन लाख किलो धान्याचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. वर्धापनदिनाच्या पानसुपारी समारंभावर होणारा खर्च यावर्षी टाळण्यात आला. या पैशांतून सकारात्मक बाब म्हणून घोसपुरी गावात स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, असे ते म्हणाले.

'दिव्य मराठी'ने नेहमीच समाजाचे प्रश्न समजून घेतले. सकारात्मक समाज घडवण्यासाठी 'नो निगेटिव्ह न्यूज'सारखा वेगळा विधायक उपक्रम सुरू केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या उपक्रमाची प्रशंसा केली. हिवरे बाजार राळेगणसिध्दीसारखी नगर जिल्ह्यात आहेत, ही अभिमानाची बाब आहे. घोसपुरीनेही या गावांप्रमाणे विकासाकडे वाटचाल करावी, त्यासाठी 'दिव्य मराठी' प्रयत्न करेल. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी "दिव्य मराठी' विविध मार्गांनी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पटवे यांनी ग्रामस्थांना दिली.

पद्मावती मंदिराशेजारच्या सभामंडपात झालेल्या या शानदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद गायकवाड यांनी केले. ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
वर्धापन दिन सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती
अनंत पाटील, अनिरुध्द देवचक्के, श्रीराम जोशी, सुदाम देशमुख, नवनाथ खराडे, सूर्यकांत नेटके, सूर्यकांत वरकड, सचिन चोभे, गणेश शेंडगे, जितेंद्र अग्रवाल, सचिन अग्रवाल, दत्ता इंगळे, मंदार साबळे, समीर मन्यार, सुनील गिते, बाबा दुसुंगे, बबन धलपे, किसन गारूडकर, सखाराम गारूडकर, साहेबराव भोसले, प्रमोद पाठक, डॉ. प्रशांत महांडुळे, डॉ. शारदा महांडुळे, अर्शद शेख, अशोक सब्बन, शिवाजी घाटगे, शिवाजी कपाळे, राम मेंघाणी, अरूण कडूस, बोनेश मेंघाणी, डॉ. ए. के. कुरेशी, राहुल पाटोळे, सुरेंद्र सोनवणे, प्रफुल्ल मुथ्था, जयंत देशपांडे, प्रमोद गांधी, किशोर गांधी, अमोल भुजबळ, प्रशांत गाडेकर, सचिन भोसले, चंद्रकांत घोडके, गुलाबराव डेरे, निशिकांत रोहकले, प्रमोद कोठुळे, दत्ता भगत, सतीश खेंगट, प्रशांत ठुबे, संतराम सूळ, किशोर कदम, शिवाजी घाडगे आदी.
बातम्या आणखी आहेत...