आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत बससेवेचा उपक्रम कौतुकास्पद, महापौर अभिषेक कळमकर यांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहरीकरणवाढत असताना, रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. पाल्यांना सुरक्षित शाळेत पोहच करण्यासाठी पालकांपुढे असलेला प्रश्न चांद सुलताना हायस्कूलने बसच्या माध्यमातून सोडवला आहे. शाळेत शिकत असलेल्या सामान्य कुटुंबीयांच्या विद्यार्थ्यांना बसची मोफत सेवा देण्याचा कौतुकास्पद उपक्रम शाळेने राबवला आहे, असे मत महापौर अभिषेक कळमकर यांनी व्यक्त केले.
चांद सुलताना हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत बससेवेचा शुभारंभ नवीन बसचे उदघाटन करून करण्यात आला. यावेळी अभिषेक कळमकर बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादा कळमकर, संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक नजीर अहमद शेख, उपाध्यक्ष तथा प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सूर शेख, सय्यद शहा निजाम, अॅड. हनिफ बाबुजी, मतिन सय्यद, हैदर खान, युसूफ बागवान, डॉ. अजिज आंबेकर, हनिफ जरीवाला, प्राचार्य नसरीन शेख महेबुब, उपप्राचार्य रिझवाना शेख, पर्यवेक्षक इलियास तांबोळी, फारूक रंगरेज आदी उपस्थित होते.

सामान्य कुटुंबीयांच्या पाल्यांसाठी त्यांना शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी शाळेने सुरू केलेल्या मोफत बससेवेचा उपक्रम प्रशंसनीय आहे, असे दादा कळमकर यांनी यावेळी बोलताना म्हणाले.
प्रास्ताविक मन्सूर शेख यांनी केले. ते म्हणाले, शाळेत भिंगार, मुकुंदनगर, लालटाकी, सावेडी शहराच्या आदी विविध भागातून अल्पसंख्याक समाजाची मुले शिक्षणासाठी येतत. सर्व विद्यार्थी सामान्य कुटुंबांतील असल्याने त्यांना शाळेतर्फे मोफत बससेवा देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य शिक्षक संस्थेचे विश्वस्त उपलब्ध करून देत असल्याचे नगरसेवक नजीर शेख म्हणाले. स्वागत प्राचार्या नसरीन शेख यांनी, तर आभार रिझवाना शेख यांनी मानले.

मोफत बससेवेच्या शुभारंभप्रसंगी महापौर अभिषेक कळमकर, दादा कळमकर, नगरसेवक नज्जू पहिलवान, प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, सय्यद शहा निजाम, अ‍ॅड. हनिफ बाबुजी, हनिफ जरीवाला, प्राचार्य नसरीन शेख महेबूब आदी.