आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत आरोग्य शिबिरांचा लाभ सर्वसामान्यांनी घ्यावा: वालगुडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- खासगी आरोग्य सेवा महागल्याने सर्वसामान्य जनता उपचारांपासून वंचित रहात आहे. त्यामुळे मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे. सर्वसामान्य जनतेने मोफत आरोग्य शिबिरांचा लाभ घेतला पाहिजे, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांनी केले.
मनपाच्या महिला व बालकल्याण समिती, तसेच एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीतर्फे अंब्रेला सोसायटीमध्ये आयोजित मोफत अारोग्य शिबिराच्या उदघाटनप्रसंगी वालगुडे बोलत होते. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती नसीम शेख, उपसभापती कलावती शेळके, बडेसाहब जहागीरदार, आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर, नगरसेविका अनिता भोसले, जयश्री सोनवणे, डॉ. सुजाता साळवे, डॉ. आयेशा शेख, देविदास सोनकांबळे आदी उपस्थित होते.
वालगुडे म्हणाले, ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहे, तेथे आजारांचे प्रमाणही जास्त आहे. या ठिकाणचे नागरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे त्यांना मोठ्या आजारांना तोंड द्यावे लागते. अशा नागरिकांनी मोफत आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा.

शेख म्हणाल्या, महिला व बालकल्याणच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. राजूरकर म्हणाले, बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात विविध योजना राबवल्या जातात. या रुग्णालयात लवकरच मोफत जेवण, तसेच मनपाच्या वाहनाने घरी सोडण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. सूत्रसंचालन देविदास सोनकांबळे यांनी, तर डॉ. सुजाता साळवे यांनी आभार मानले.