आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपंगांना मोफत व्यावसायिक शिक्षणाची संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पुणे येथील जागृत अपंग संघटना संचलित महात्मा फुले अपंग प्रशिक्षण केंद्रात अपंगांना मोफत प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणाचा अपंगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी मुख्याध्यापक जी. पी. जगताप यांनी केले आहे.
पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कजवळ हे प्रशिक्षण केंद्र चालवले जाते. प्रशिक्षण केंद्राकडून शिक्षण, प्रबोधन, पुनवर्सन क्रीडा या चौसुत्रीच्या कार्यक्रमांद्वारे अपंगांमध्ये कौशल्य वृद्धी घडवण्याचा प्रयत्न केला जातो. १६ ते ३० वयोगटातील किमान चौथी ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या अपंगांना राज्य शासनाकडून मान्यताप्राप्त व्यावसायिक तंत्रशिक्षण देण्याची व्यवस्था प्रशिक्षण केंद्रात केली जाते. निवास भोजनाची सुविधा प्रशिक्षणार्थ्यांना मोफत पुरवण्यात येते. प्रशिक्षण कालावधीत तीनचाकी सायकल, शस्त्रक्रिया क्रॅचेस कॅलिपर्स, व्यवसायासाठी लागणारे साहित्य, शिलाई मशीन, इलेक्ट्रॉनिक साहित्य, संगणक आदी मोफत उपलब्ध करून देण्यात येतात. प्रशिक्षणानंतर हिंजवडी आयटी पार्कमध्ये नोकरीची संधीही काही प्रशिक्षणार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येते. प्रशिक्षणाचा कालावधी दोन महिने ते एक वर्षापर्यंत आहे. अधिक माहितीसाठी महात्मा फुले अपंग प्रशिक्षण केंद्र, सर्व्हे नंबर १६२ माण, हिंजवडी आयटीपार्कजवळ, पुणे या पत्त्यावर किंवा ९८२२०१०५१०, ९१७५४९२९८३ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन जगताप यांनी केले आहे.