आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरात इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेतर्फे पुतळादहन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीचे तीव्र पडसाद शुक्रवारी शहरात उमटले. सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ आमदार अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने माळीवाडा वेशीजवळ काँग्रेसच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
यावेळी महापौर शीला शिंदे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, दत्ता मुदगल, दीपक सूळ, युवा सेनेचे विक्रम राठोड यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. काँग्रेसच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केल्यानंतर आमदार राठोड म्हणाले, महागाईच्या आगीत तेल ओतण्याचे काम करुन काँग्रेस सरकार जनतेच्या सहनशीलतेचा अंत पहात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फक्त सरकारच्या निर्णयाला विरोध करतो, परंतु सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची हिंमत राष्ट्रवादीमध्ये नाही.