आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दौंड-मनमाड दुहेरीकरणासाठी 2330 कोटींच्या खर्चाला मंजुरी, शहरासाठी फायदेशीर ठरणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरकरांसाठी वेगवान वेळेवर चालणाऱ्या रेल्वेचे स्वप्न आता प्रत्यक्षात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक विषयावरील मंत्रिमंडळ समितीने मंगळवारी दौंड-मनमाड या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी २३३०.५१ कोटींच्या खर्चास मंजुरी दिली आहे. हा मार्ग २०२१-२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर नगरकरांना वेळेत धावणाऱ्या वेगवान रेल्वेसेवेचा अनुभव घेता येणार आहे. या शिवाय शिर्डी, शनिशिंगणापूर येथील पर्यटन वाढ, तसेच नगर शहराच्या विकासालाही पूरक ठरणार आहे. थेट नगर-पुणे रेल्वेच्या सेवेसाठीही ते फायद्याचे ठरणार आहे. 
 
दौंड-मनमाड हा २४७.५ किलोमीटरचा मार्ग रेल्वेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत हजार ८१.२७ कोटी आहे. मूळ किंमतीत दरवर्षी टक्के वाढ गृहित धरून या प्रकल्पाचा पूर्णत्वाचा खर्च २३३०.५१ कोटी असणार आहे. हा मार्ग अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, कारण हा मार्ग उत्तरेकडून मुंबईला जोडणाऱ्या मार्गाला पर्याय ठरणारा आहे. सध्या उत्तर भारत ते मुंबई दरम्यान असलेल्या रेल्वे मार्गावरील वाहतूक प्रचंड आहे. तो ताण हा मार्ग पूर्ण झाल्यावर वळवणे शक्य होणार आहे. या मार्गाचे दुहेरीकरण करावे, अशी अनेक वर्षांची मागणी आहे. कारण सध्याच्या एकच मार्गामुळे दोन गाड्यांच्या क्रॉसिंगच्या वेळी वेळ वाया जातो. या शिवाय गाड्यांच्या वेगालाही मर्यादा येत आहे. या मार्गाचे विद्युतीकरणही नुकतेच पूर्ण होऊन विद्युत इंजिनाच्या गाड्या धावत आहेत. पण, एकमार्गामुळे त्यांच्या वेगाला मर्यादा येत आहेत. दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर या तृटी दूर होतील. त्यामुळे प्रवासी माल वाहतुकीस वेग सुलभता येणार आहे. 
 
लष्कराच्या दृष्टीने नगर शहर अतिशय महत्त्वाचे आहे. दुहेरीकरण झाल्यावर या मार्गावरून दुप्पट गाड्यांची वाहतूक सुरू होईल. त्यामुळे नगर शहर रेल्वेच्या सेवेने भारतातील महत्त्वाच्या शहरांशी जोडले जाणार आहे. याचा फायदा येथून देशाच्या इतर भागात जाणाऱ्या लष्करी अधिकारी जवानांना होणार आहे. 

या मंजुरीबद्दल या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे नगरचे खासदार दिलीप गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचे अभिनंदन केले आहे. 
 
पर्यटन वाढणार 
नगरजिल्ह्यात शिर्डी शनिशिंगणापूर ही महत्त्वाची धार्मिक पर्यटनस्थळे आहेत. दुहेरीकरणामुळे गाड्यांच्या संख्येत वाढ होईल. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांना येथे पोहोचण्यासाठी रेल्वेची सेवा उपलब्ध होईल. नगर परिसरातील पर्यटन वाढीलाही ते उपयुक्त ठरणार अाहे. 
 
आर्थिक उलाढालीस चालना मिळणार 
दौंड-मनमाड मार्गाच्या दुहेरीकरणामुळे या मार्गावरील सर्व गावे शहरांच्या आर्थिक उलाढालीत वाढ होणार आहे. विशेषत: नगर शहराला त्याचा विशेष लाभ होणार आहे. कारण उद्योगांना त्यांच्या गरजांनुसार अतिरिक्त वाहतूक क्षमता उपलब्ध होणार आहे. त्याचा फायदा उद्योग क्षेत्राला चालना मिळण्यात होणार आहे. 
 
खासदार दिलीप गांधी यांच्या पाठपुराव्याला यश 
खासदारदिलीप गांधी यांनी आपल्या खासदारकीच्या कालखंडात सातत्याने रेल्वेबाबत इतर सेवांबाबत दौंड-मनमाड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण विद्युतीकरणाच्या मागणीसाठी जोरदार पाठपुरावा केला. दरवर्षी ते रेल्वेच्या अर्थसंकल्पाआधी रेल्वेमंत्र्यांकडे हा विषय मांडत होते. सन २०१५ मध्ये या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी नऊ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी आला होता. मंगळवारी मंत्रिमंडळाने या मार्गाच्या दुहेरीकरण विद्युतीकरणासाठी २३३० कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली. त्यामुळे खासदार गांधी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे. 
 
सुरक्षित सुलभ प्रवास शक्य 
दुहेरीकरणामुळे रेल्वेच्या वेगात वाढ होणार आहे. तसेच, गाड्यांची संख्या वाढल्याने जास्तीत जास्त प्रवाशांना रेल्वेच्या सुलभ सेवेचा लाभ घेता येणे शक्य होणार आहे. त्याचा परिणाम रस्त्यावरील वाहतुकीचा ताण अपघातांतही घट शक्य होणार आहे.  
 
बातम्या आणखी आहेत...