आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीसाठी सरकारची ‘अंत्ययात्रा’; शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे फेकले, रास्ता रोको अांदाेलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी सोमवारी नगर जिल्ह्यातील राहाता येथील शेतकऱ्यांनी राज्य सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. तसेच भाव नसलेला कांदा रस्त्यावर फेकून भरउन्हात रास्ता रोको आंदोलन केले.  

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतीमालाला हमी भाव द्या, वीज बिल माफ करा, पाणीपट्टी माफ करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांतील मुलांचे शिक्षण मोफत करा व नोकरी द्या या मागण्यांसाठी राहाता परिसरातील शेतकऱ्यांनी वीरभद्र मंदिर ते शिवाजी चौकापर्यंत राज्य सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. पोलिसांनी हस्तक्षेप करत हा पुतळा ताब्यात घेतला. नंतर शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर ओतून तासभर रास्ता रोको आंदोलन केले.  

या आंदोलनाचे नेतृत्व गणेश साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ यांनी केले. ते म्हणाले, ‘हे सरकार शेतकरीविरोधी अाहे. गेल्या चार कांदा, तूर, भाजीपाला, ऊस तसेच फळांना भाव नाही. उत्पादन खर्चही निघत नाही. सरकार मदत करत नाही, केवळ आश्वासने देते. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत.’ 
बातम्या आणखी आहेत...