आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस बंदोबस्तात सनीवर अंत्यसंस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - प्रतिनिधी खासदार रामदास आठवले यांनी अंत्यविधीस उपस्थित राहून शांततेचे आवाहन केले. दरम्यान, तुरूंगात असलेले सनीचे वडील भाऊ यांना अंत्यविधीसाठी आणावे, या मागणीसाठी सनीचे कुटुंबीय आरपीआय कार्यकर्त्यांनी अंत्ययात्रा सुरू असताना अमरधाम रस्त्यावर रास्ता रोको केला. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. अंत्यविधीनंतर मात्र तणाव निवळला.

अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत्याप्रकरणी बालसुधारगृहात ठेवण्यात आलेला नंतर तेथून पळून गेलेल्या सनी शिंदे याचा मृतदेह बीड जिल्ह्यात सापडला. याप्रकरणी ११ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे नगर शहरात मोठी खळबळ उडाली. शवविच्छेदनानंतर सनीचा मृतदेह शुक्रवारी शहरात आणण्यात आला. परंतु त्याच्या नातेवाईकांनी सर्व आरोपींना अटक झाल्यानंतरच अंत्यविधी करू, अशी भूमिका घेतली. त्यामुळे मृतदेह तसाच रुग्णवाहिकेत होता.

जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सनीच्या नातेवाईकांची शनिवारी सकाळी भेट घेऊन त्यांची समजूत काढली. नंतर अंत्यविधी करण्यास नातेवाईक तयार झाले. सनीच्या बुरूडगाव रस्त्यावरील भोसले आखाड्यातील घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत पाचशे ते सहाशे कार्यकर्ते उपस्थित होते.

अंत्ययात्रा अमरधाम रस्त्यावर आल्यानंतर सनीचे कुटुंबीय कार्यकर्त्यांनी रिमांडहोमजवळ रास्ता रोको आंदोलन सुरू केले. सनीचे तुरुंगात असलेले वडील शरद शिंदे भाऊ संदीप शिंदे यांना अंत्यविधीसाठी आणावे, अशी त्यांची मागणी होती. परंतु पोलिसांनी त्यांची समजूत काढली. नंतर अमरधाममध्ये सनीवर अंत्यविधी करण्यात आला. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तथापि, खासदार आठवले यांनी अंत्यविधीस हजेरी लावून सर्व कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यामुळे तणाव निवळला.

चार आरोपींना पर्यंत कोठडी
सनीशिंदे खूनप्रकरणात बीड जिल्ह्यातील पाटोदा पोलिसांनी आतापर्यंत १४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुरूवातीला ११ जणांवरच गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी आणखी जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. १४ पैकी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना शनिवारी पाटोदा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

अमरधाममध्ये पोलिस बंदोबस्त
अंत्यविधीच्यावेळी काही गडबड होऊ नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली होती. अंत्ययात्रेदरम्यान, तसेच अंत्यविधीच्या वेळी अमरधाम परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांचा फौजफाटा पाहून काही तरी गडबड होईल, अशी चर्चा दुपारपर्यंत दबक्या आवाजात सुरू होती.


भोसले आखाड्यात तणाव कायम
मृतसनी शिंदेचे कुटुंब बुरूडगाव रस्ता परिसरात भोसले आखाड्यात राहते. याच परिसरात काही आरोपींची घरे आहेत. शिवाय आरोपींमध्ये प्रभागाचे नगरसेवक गणेश भोसले यांचेही नाव आहे. त्यामुळे या भागात गेल्या दोन दिवसांपासून पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. सनीचा मृतदेह शुक्रवारी आणला गेला, तेव्हापासून परिसरात तणाव आहे. सनीच्या अंत्यविधीनंतरही हा तणाव कायम होता. शहरातील तणाव मात्र पूर्णपणे निवळला आहे.