आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तर भावी पिढी तुम्हाला कदापिही माफ करणार नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आपण येणार्‍या पिढय़ांना काय देणार आहोत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्वत:पासून सुरुवात केली नाही, तर येणारी भावी पिढी तुम्हाला कदापिही माफ करणार नाही. त्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी दुसरा कोणीतरी आदर्श निर्माण होईल, याची वाट पाहत बसू नका. त्याऐवजी तुम्ही स्वत:च एक आदर्श व्हा, असे आवाहन चित्रकार मकरंद टिल्लू यांनी केले.
पाण्याचा अपव्यय, रंगांमुळे होणारी त्वचेची व आरोग्याची हानी थांबवण्यासाठी प्रेरक फाउंडेशनच्या वतीने वाडिया पार्कमध्ये ‘चित्रपंचमी’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. गेल्या वर्षी पाइपलाइन रोडवरील तुळजाभवानी मंदिरात नगरमधील प्रेरक फाउंडेशनच्या काही युवकांनी एकत्र येत या उपक्रमाला सुरुवात केली होती. यंदा या उपक्रमात सुमारे सव्वाशे आबालवृद्ध सहभागी झाले.
सिद्धार्थ ट्रेडर्सच्या भरत बागरेचा यांच्या पुढाकाराने मोठा कागदाचा रोल अंथरवून हातात रंग व ब्रश घेऊन जमलेल्या लोकांना मनसोक्त चित्र काढायला सांगितले. पाहता-पाहता दोनशे लोक या उपक्रमात सहभागी झाले. यामध्ये दोन वर्षांच्या मुलापासून 70 वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वांनी मनमुराद चित्रे काढली. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांनीच नंतर पाण्याची उधळपट्टी करणारी रंगपंचमी खेळण्यापासून परावृत्त होण्याचा ठाम निर्धार केला.
एकीकडे डीजे लावून आणि रंगांची उधळण करत रंगपंचमी साजरी करण्यात आली, तर दुसरीकडे शांततते नैसर्गिक रंगांद्वारे चित्र काढून रंगमंचमी साजरी करण्यात आली. सुमारे दीड हजार लहान मोठय़ांनी यात सहभाग घेतला. 1800 मीटर लांब कागदावर चित्र काढण्यात आले. 120 लीटर नैसर्गिक रंगाचा वापर करण्यात आला. या चित्रपंचमीसाठी येणार्‍यांचे पाणी बचतीचा संदेश म्हणून नळाची तोटी देऊन स्वागत करण्यात आले.