आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा प्रतिष्ठानकडून पोलिसांना भोजन अन् पाणी....

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्तावर असलेल्या शहरातील पोलिसांना यावर्षी सुखद धक्का मिळाला. बंदोबस्ताच्या तणावात असलेल्या पोलिसांना बंदोबस्ताच्या ठिकाणी भोजनाचे पॅकेटस् पाणी पुरवण्याचा उपक्रम आदर्श मराठा प्रतिष्ठानने राबवला.

बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांवर अधिक जबाबदारी असते. त्यामुळे बंदोबस्ताचे ठिकाण सोडून त्यांना इतरत्र जाणे शक्य हाेत नाही. ही त्यांची अडचण तसेच पुण्या-मुंबईत मिरवणुकीतील बंदोबस्तात व्यग्र असणाऱ्या पोलिसांना सामाजिक संघटनांकडून पुरवण्यात येणारी सुविधा लक्षात घेऊन प्रतिष्ठानने हा उपक्रम हाती घेतला. पर्यावरणपूरक पिशव्यांमधून ड्रायफ्रुटयुक्त पुलाव पिण्याच्या पाण्याची बाटली बंदोबस्ताच्या ठिकाणी पुरवण्याचे नियोजन प्रतिष्ठानकडून करण्यात आले. यासाठीचा निधीही प्रतिष्ठानच्या सदस्यांनी आपसातच जमवला होता, तसेच दरमहाच्या वर्गणीचाही हातभार या उपक्रमाला लागला.

विसर्जन मिरवणुकीत सर्वाधिक महत्त्वाचा असणारा पोलिस हा घटक दुर्लक्षित राहतो. मिरवणुकीच्या तयारीपासून ते ती शांततेत पार पडेपर्यंत पोलिसांना उसंत नसते. बंदोबस्ताचा ताण अधिक असतानाच्या सायंकाळच्या वेळी प्रतिष्ठानच्या दोनशे सदस्य कार्यकर्त्यांनी हा उपक्रम राबवला.
रविवारी (२७ सप्टेंबर) सायंकाळी वाजता चितळे रस्त्यावर ग्रामदैवत विशाल गणपतीच्या मिरवणुकीत आरती करून उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रतिष्ठानचे सदस्य कार्यकर्त्यांनी नेता सुभाष चौक, नवीपेठ, कापड बाजार, दाळमंडई यासह विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर बंदोबस्तात व्यस्त असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना भोजनाचे पॅकेट पाण्याची बाटलीचे वितरण केले. अधिकाऱ्यांकडून बंदोबस्तावरील पोलिसांची संख्या ठिकाणांची माहिती प्रतिष्ठानला देण्यात आली होती. त्यानुसार पायी फिरून प्रतिष्ठानच्या सदस्य कार्यकर्त्यांनी पोलिसांना बंदोबस्ताच्या ठिकाणी ही सुविधा पुरवली.

विसर्जन मिरवणुकीतील पोलिस होमगार्डंना वाटप झाल्यानंतर तोफखाना पोलिस ठाण्यातील कर्मचारी तसेच सावेडी, पाइपलाइन रस्ता या भागात बंदोबस्तावर असलेल्या पाेलिसांना भोजन पुरवले. रात्री वाजेपर्यंत प्रतिष्ठानकडून हा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे प्रमोद काळभोर यांनी दिली.

विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना बंदोबस्ताच्या ठिकाणी भोजन पाणी पुरवण्याच्या उपक्रमांतर्गत तोफखाना पोलिस ठाण्यात पोलिसांना भोजनाचे पॅकेटस् देताना आदर्श मराठा प्रतिष्ठानचे सदस्य कार्यकर्ते.

पुढील वर्षी व्यापक स्वरूप
यावर्षीच्या अनुभवातून पुढील वर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत अधिक व्यापक चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. गरजेच्या वेळी सुविधा मिळाल्याचे समाधान पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये दिसत होते. गैरसोय दूर केल्याबद्दल पोलिस कर्मचारी अधिकाऱ्यांकडून प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतूक करण्यात आले असून यातून प्रतिष्ठानच्या कार्याला पाठबळ मिळाले. '' सौरभवाघ, सदस्य,आदर्श मराठा प्रतिष्ठान.