आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - गणपत्ती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात सोमवारी घरोघरी, तसेच सार्वजनिक मंडळांत गणपतीची प्रतिष्ठापना होईल. गणराया येणार असल्यामुळे शहरात उत्सवी वातावरण आहे. वाढती महागाई, रस्त्यांवर पडलेले खड्डे व नित्याची वाहतूक कोंडी या सार्या चिंता आता सुखकर्ता आणि विघ्नहर्त्यावर सोडून देत पुढचे दहा दिवस त्याच्या चरणी सेवा अर्पण करण्यासाठी नगरकर सज्ज झाले आहेत.
शहरात गणरायाचे मोठय़ा जल्लोषात स्वागत होणार आहे. सनई-चौघडा व ढोलताशांच्या निनादात मांगल्याचे प्रतीक असलेल्या बुद्धिदेवता गणरायाची प्रतिष्ठापना केली जाईल. सार्वजनिक मंडळे मिरवणुकीने मूर्ती आणतील. शहराचे ग्रामदैवत असलेल्या माळीवाड्यातील विशाल गणपती मंदिरात जिल्हा पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता र्शीगणेशाची प्रतिष्ठापना केली जाईल. या वेळी देवस्थानचे अध्यक्ष अँड. अभय आगरकर, पंडितराव खरपुडे, बाबासाहेब सुडके, महंत संगमनाथ महाराज उपस्थित असतील. प्रतिष्ठापनेनंतर गणरायाची महाआरती होईल.
बाप्पाच्या आगमनासाठी आवश्यक असलेली तयारी रविवारी पूर्ण झाली. माळीवाडा, चितळे रोड, गांधी मैदान, प्रेमदान चौक, पाइपलाइन रोड, भिंगार व केडगाव परिसरात गणेशमूर्ती, तसेच पूजासाहित्याचे स्टॉल आहेत. रविवारी सायंकाळी काहींनी वाजतगाजत मूर्ती घरी नेली.
सार्वजनिक गणेश मंडळांनी रस्त्याच्या दुतर्फा कमानी उभारल्या आहेत. दिव्यांच्या माळा, रंगीत पताका, रेशमी व कलाकुसरीच्या कापडाने या कमानी सजवल्यामुळे उत्सवी वातावरण आहे. सार्वजनिक संस्था, तसेच विविध दुकानांमध्येही र्शीगणेशाची प्रतिष्ठापना केली जाईल.
गणरायाच्या नैवेद्यासाठी लागणार्या उकडीच्या मोदकांबरोबर चॉकलेटचे मोदक, आंबा मोदक व खिरापत, तसेच हार व फुलांना चांगली मागणी आहे. जास्वंदीचे फूल, पगडी, विड्याची पाने, जानवे, मोदक, 21 दुर्वांचा हार बाजारात उपलब्ध आहेत. गणेशोत्सवात विविध ठिकाणी सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
केडगाव व भिंगारमध्ये उत्सवी वातावरण
केडगाव व भिंगारमध्येही गणरायाचे मोठय़ा जल्लोषात स्वागत होणार आहे. भिंगार येथील ब्राrाण गल्लीतील मानाच्या देशमुख गणपतीची प्रतिष्ठापना आधी केली जाईल. रविवारी सायंकाळी मूर्ती, मोदक व लाडू घेण्यासाठी गर्दी झाली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.