आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गणरायांच्या स्वागताची तयारी यंदा उशिराच... शहरातील मिरवणूक मार्गाची अवस्था वाईट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - उशिराका होईना, पण महापालिकेला बाप्पांच्या स्वागताची आठवण झाली आहे. आतापर्यंत मिरवणूक मार्ग इतर रस्त्यांवरील खड्ड्यांच्या पॅचिंगचे काम पूर्ण होणे आवश्यक होते, परंतु या कामास उशिरा सुरुवात झाली. शहरातील अतिक्रमणे हटवण्याचे नियोजनही पूर्ण झाले आहे. पोलिस बंदोबस्त उपलब्ध होताच ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी मात्र अद्याप कोणतेच नियोजन झालेले नाही. त्यामुळे बाप्पांच्या स्वागताची तयारी वेळेत पूर्ण होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. घरोघरी महिनाभर आधीच गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू होते. महापालिकेला मात्र यंदा बाप्पांच्या स्वागताचा विसर पडला. बाप्पांच्या आगमनाच्या किमान दहा दिवस आधी मिरवणूक मार्ग इतर रस्त्यांचे पॅचिंग, पथदिव्यांची दुरुस्ती, साफसफाई, अतिक्रमणे हटवणे, गणेश मंडळांची बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना देणे, त्यासाठी योग्य नियोजन करणे ही महापालिका प्रशासन सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे. परंतु गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आत्ता कुठे तयारी सुरू केल्याचे दिसते. रामचंद्र खुंट, दाळमंडई, तेलीखुंट, एम. जी. रोड, अर्बन बँक रोड, नवी पेठ, नेता सुभाष चौक, चितळे रस्ता, दिल्ली दरवाजा या मिरवणूक मार्गावरील खड्डे अजूनही तसेच आहेत. अनेक पथदिवे बंद आहेत. त्याचबरोबर मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणांचा प्रश्नदेखील गंभीर बनला आहे. गणेशोत्सवाच्या किमान पंधरा दिवस आधी हे प्रश्न सोडवणे गरजेचे आहे, परंतु गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपल्यानंतर महापालिकेने या कामांना सुरुवात केली आहे. त्यामुळे ही कामे वेळेत पूर्ण होतील की नाही, याबाबत शंकाच आहे. मिरवणूक मार्गासह इतर अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यांची वेळेत डागडुजी झाली नाही, तर नगरकरांची उत्सव काळात मोठी गैरसोय होणार आहे. महापालिकेच्या एकाही अधिकाऱ्याने अद्याप मिरवणूक मार्ग उखडलेल्या रस्त्यांची पाहणी केलेली नाही. अतिक्रमणे हटवण्यासाठी नियोजन करण्यात आले, परंतु पोलिस बंदोबस्त उपलब्ध झाल्यानंतरच या मोहिमेला मुहूर्त मिळणार आहे. पथदिव्यांच्या दुरुस्तीचेही कोणतेच नियोजन झालेले नाही. या दुरूस्तीसाठी आवश्यक असलेले पुरेसे साहित्य उपलब्ध होईल की नाही, हा प्रश्नच आहे. ऐनवेळी जागी होणाऱ्या महापालिकेच्या या नियोजनशून्य कारभाराच्या विरोधात नगरकर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. मिरवणूक मार्गाची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. गणेश मंडळांनी मंडपाची उभारणी सुरू केली आहे. अतिक्रमणे काढणार शहरातील लहान-मोठी अतिक्रमणे काढण्यासाठी महापालिकेने पूर्ण तयारी केली आहे. उपायुक्त अजय चारठाणकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात येणार आहे. पोलिस बंदोबस्त उपलब्ध होताच ही कारवाई सुरू होईल. रस्त्यांच्या पॅचिंगचे काम सुरू करण्यात आले आहे, परंतु हे काम केवळ ठरावीक ठिकाणीच होण्याची शक्यता आहे. सर्वच रस्त्यांवरील खड्डे बुजवणे आवश्यक आहे. तसे नियोजन महापालिकेने करावे, अशी मागणी नगरकर करत आहेत. अाज बैठक मंडपउभारणीबाबत न्यायालयाने ठरवून दिलेल्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. या पार्श्वभूमीवर महापौर सुरेखा कदम यांनी बैठक आयोजित केली आहे. सोमवारी दुपारी वाजता महापालिका सभागृहात शहरातील गणेश मंडळांचे सदस्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्या बैठक घेणार आहेत. गणेश मंडळांच्या सूचना मागण्यांचा योग्य विचार करून मंडप उभारणीचे धोरण निश्चित करण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...