आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पारंपरिक वाद्यांच्या गजरात, भिंगारमध्ये गणरायाला निरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- भिंगारमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायांना शनिवारी रात्री उत्साहात निरोप देण्यात आला. दुपारी २ वाजता विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीत १२ मंडळे सहभागी झाली होती. एका मंडळाचा अपवाद वगळता इतर अकरा मंडळांनी यंदा डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या तालावर विसर्जन मिरवणुकीत भाग घेतला.
सकाळी अकरा वाजता मानाच्या देशमुख गणपतीची उत्थापन पूजा जिल्हा पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांच्या हस्ते करण्यात आली. या पूजेचे पौरोहित्य प्रसाद कुलकर्णी यांनी केले. भिंगारकरांच्या वतीने पांडुरंग देशमुख व शालिनी देशमुख यांच्या हस्ते पोलिस अधीक्षकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्तिक देशमुख, अश्विनकुमार देशमुख, समीर देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबीय उपस्थित होते. विसर्जन मिरवणूक दुपारी २ वाजता सुरू झाली. या मिरवणुकीत एकूण बारा मंडळांनी भाग घेतला. त्यापैकी अवघ्या एका मंडळाने डीजेच्या तालावर मिरवणूक काढली. इतर अकरा मंडळांनी ढोल व ताशा या पारंपरिक वाद्यांच्या तालावर विसर्जन मिरवणुकीत भाग घेतला. मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
भिंगार येथील गणेश विसर्जन मिरवणूक शनिवारी पारंपरिक वाद्यांच्या मोठ्या उत्साहात नादात पार पडली. प्रारंभी जिल्हा पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांच्या हस्ते मानाच्या देशमुख गणपतीची उत्थापन पूजा झाली.