आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपरगाव तालुक्यात विवाहितेवर गँगरेप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव - एकट्या राहत असलेल्या 32 वर्षांच्या महिलेवर चौघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा शिवारात गुरुवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध कोपरगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही महिला एकटीच राहत होती. गुरुवारी पहाटे चौघांनी तिला घरातून बाहेर काढून अत्याचार केले. नंतर ते पसार झाले. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुनीता ठाकरे, पोलिस निरीक्षक मधुकर औटे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.