आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gang Raped Woman In Sangamner Taluka, Three Arrested

संगमनेर तालुक्यात महिलेवर सामूहिक अत्याचार, तिघे अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - पस्तीस वर्षीय विवाहितेवर घरात कोणी नसल्याचा फायदा घेत सहा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील देवगाव येथे सोमवारी रात्री समोर आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संबंधित महिलेच्या पतीच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी तिघांना पोलिसांनी अटक केली.

मोलमजुरीसाठी संगमनेर तालुक्यातील देवगाव येथे आलेल्या परजिल्ह्यातील एका मतिमंद महिलेवर हा प्रसंग गुदरला. शनिवारी या महिलेचे पती आणि मुलगी संगमनेरमध्ये आठवडे बाजारासाठी आले होते. त्यावेळी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत दुपारी साडेतीनच्या सुमारास या विवाहितेवर सहा जणांनी अत्याचार केले. तिच्यावरील अत्याचाराची घटना पती घरी आल्यानंतर त्याला कळली. तसेच काही जणांनी यात मध्यस्थी करून प्रकरण दडपण्याचाही प्रयत्न केला. मात्र, घटनेची चर्चा वाढल्याने मदतीचा आकडाही वाढत होता. मात्र, काही जणांनी या घटनेची माहिती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन चव्हाण यांना दिली. चव्हाण यांनी तातडीने देवगाव गाठले आणि घटनेची माहिती घेतली. मागासवर्गीय महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची खात्री पटताच त्यांनी याची माहिती पोलिस उपअधीक्षक नितीन चव्हाण यांना दिली. संबंधित अत्याचारित महिला आणि तिच्या नातेवाईकांना घेऊन ते पोलिस ठाण्यात आले. महिलेची मानसिक अवस्था लक्षात घेता याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात अत्याचाराचा आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहाजणांपैकी चौघांची नावे पोलिस तपासात निष्पन्न झाली असून त्यापैकी अण्णासाहेब गोविंद पावसे (वय २५), संदीप विठ्ठल नालकर (वय २३) आणि अरुण रामभाऊ लामखेडे (वय ३२, तिघे देवगाव) यांना अटक केली. दरम्यान, अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पुढे वाचा.. मुलीच्या लैंगिक शोषणप्रकरणी महिलेसह अटकेत