आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोडेखोरांची टोळी गजाआड, तीन फरार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे - दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्त जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र देवगड येथे प्रथमच स्थानिक गुन्हे शाखेचे दोन अधिकारी २० कर्मचारी बंदोबस्तासाठी देण्यात आले होते. पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे सुधीर पाटील यांची दोन पथके होती. डॉ. गोर्डे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मुरमे ते मडकी रस्त्यावर काही अनोळखी व्यक्ती दबा धरून दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत.

 

पोलिसांची चाहूल लागताच तीन मोटारसायकलींवर बसलेले तिघेजण पळून गेले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दबा धरून बसलेले पाचजणही पळू लागले, पण पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. कृष्णा भानुदास माठे (३८, ओझर, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), रोहित विलास सौदागर (२५, श्रीरामपूर), सागर सुरेश कांबळे (२६, रामनगर, श्रीरामपूर), बजरंग रघुनाथ पवार (२४, माणिक दौंडी, ता. पाथर्डी), अशोक नवनाथ पवार (२६, नाथनगर, ता. पाथर्डी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे रोख रक्कम, दरोडा टाकण्याचे साहित्य, घातक हत्यारे सापडली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे, सहायक निरीक्षक शरद गोर्डे, पोसई सुधीर पाटील, हेडकॉन्स्टेबल सुनील चव्हाण, योगेश गोसावी, संभाजी कोतकर, पो. ना. संदीप पवार, राहुल हुसळे, जयवंत तोडमल, विशाल गवांदे, सचिन अडबल, अशोक गुंजाळ, सूरज वाबळे, गणेश मैड, किरण जाधव, बबन बेरड, संदीप आजबे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...