आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुरूडगाव कचरा डेपोप्रश्नी आज लवादासमोर सुनावणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - बुरूडगाव कचरा डेपोप्रश्नी राष्ट्रीय हरित लवादासमोर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. दोन दिवसांत कचरा डेपोतील अॅनिमल वेस्टचा प्रश्न सोडवून शहरातील बेकायदा कत्तलखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश लवादाने मागील सुनावणीत दिले होते. त्यानुसार केलेल्या कार्यवाहीचा अहवाल महापालिका प्रशासन लवादासमोर सादर करणार आहे. दरम्यान, प्रशासनाकडून करण्यात आलेली कार्यवाही तुटपुंज्या स्वरूपाची असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीत लवादाची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिका प्रशासनाने कचरा डेपोत टाकलेले जनावरांच्या टाकाऊ मांसाची विल्हेवाट लावली. परंतु मनपाने केलेली ही कार्यवाही तुटपुंज्या स्वरूपाची असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने शहरातील ७८ बेकायदा कत्तलचखाने चालकांना नोटिसा बजावून दहा कत्तलखान्यांना सील ठोकले आहे. डेपोत मांस टाकणाऱ्या दहाजणांच्या विरोधात पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारदेखील करण्यात आली आहे. या सर्व कार्यवाहीचा अहवाल प्रशासन लवादासमोर सादर करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अायुक्त दिलीप गावडे यांनी गुरूवारी दुपारी संबंधित अधिकाऱ्यांची बैठकही घेतली.

प्रशासनाने सादर केलेल्या अहवालाबाबत लवादाची काय भूमिका असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत संतापलेल्या लवादाने थेट अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासनाच्या अहवालावर समाधान झाल्यास लवादाकडून कठोर भूमिका घेण्यात येण्याची शक्यता आहे.

कारवाई तात्पुरतीच
शहरातील कत्तलखान्यांवर आमचा वॉच असेल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. सर्व कत्तलखान्यांना नोटिसा बजावून काहींवर कारवाईदेखील केली. परंतु ही कार्यवाही केवळ लवादाच्या भीतीने करण्यात आली असल्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवारची सुनावणी उरकताच प्रशासनाचे कचरा डेपोसह शहरातील बेकायदा कत्तलखान्यांकडे दुर्लक्ष होणार असल्याचे बुरूडगाव येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
बातम्या आणखी आहेत...