आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये जगातील पहिल्या ‘गर्भिणीप्राश’ची निर्मिती, नैसर्गिक प्रसुतीसाठी फलदायी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जगातील पहिल्या आयुर्वेदिक ‘गर्भिणीप्राश’ची निर्मिती नगरमधील शारदा व प्रकाश महांडुळे या दाम्पत्याने केली आहे. या प्राशमुळे गर्भधारणेतील अडचणी दूर होतात, गर्भधारणेनंतर गर्भस्थ बाळाची सर्वांगिण वाढ होण्यास मदत होते, तसेच सिझेरियन टाळून नैसर्गिक प्रसुती होण्यासाठी हे गर्भिणीप्राश फलदायी आहे, असा दावा या आयुर्वेदिक संशोधनाच्या निर्मात्या डॉक्टर दाम्पत्याने केला आहे.
हे च्यवनप्राश शरीरावर कुठलाही दुष्परिणाम करीत नाही. त्यामुळे अनेक दाम्पत्यांच्या जीवनात संततीचे आगमन झाल्याचा दावा प्रणव हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरचे प्रमुख डॉ. प्रशांत महांडुळे यांनी केला आहे. अन्न औषध व प्रशासन विभागाकडून नुकताच या संशोधनाबाबतचा परवाना मिळाला आहे. महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेमार्फत अनेक अंगणवाड्या, शाळांमधून, डॉ. महांडुळे यांच्या शिबिरे, प्रशिक्षणातून हे संशोधन सध्या प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यात येत आहे.

वैद्यकीय व्यवसाय सांभाळून महांडुळे दाम्पत्याने ‘गर्भिणीप्राश’ निर्मितीसाठी स्वतंत्र अद्ययावत निर्जंतूक व स्वच्छ, वातानुकुलित औषधागार उभारले आहे. प्रशिक्षित कर्मचार्‍यांच्या मदतीने निवडक व प्रमाणित अशा सुमारे 145 आयुर्वेदिक औषधे, वनस्पतींच्या मात्रा, सुत्रांसह अवलेह निर्मिती पद्धतीने हे ‘गर्भिणीप्राश’ बनवण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे या निर्मितीतून आतापर्यंत जवळपास 25 कर्मचार्‍यांना रोजगार निर्मितीही मिळालेली आहे. डॉ. शारदा महांडुळे यांनी आजवर विविध पुस्तकांचे लेखन व गर्भसंस्कार या सीडीची निर्मिती केली आहे. याकामी त्यांना उमाकांत महांडुळे, मीरा मेडिकल फाऊंडेशन, प्रणव हॉस्पिटल मेडिकल व रिसर्च सेंटर, केडगाव यांचे मार्गदश्रन व सहकार्य लाभले.