आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

.. तर उद्यान तयार करता कशाला ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - निगराणी ठेवता येत नसेल, तर नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करून उद्यानांची उभारणी करता कशाला, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते श्याम आसावा यांनी आयुक्त विजय कुलकर्णी यांना केला आहे.

निवेदनात म्हटले आहे, शहरातील सर्वच उद्यानांची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. काही वर्षांपूर्वी सारसनगर येथील मधुबन कॉलनीत मोठा खर्च करून मुलांसाठी बालउद्यान उभारण्यात आले. परंतु सध्या या ठिकाणी उद्यान होते का, असा प्रश्न पडतो. इतर उद्यानांची अशीच अवस्था आहे. मनपाने उद्यानांच्या देखभालीसाठी मोठा ताफा नियुक्त केला आहे, तरीही उद्यानांची दुरवस्था झाली आहे. नागरिकांकडून कररूपाने गोळा केलेल्या पैशांची अशाप्रकारे उधळपट्टी करणे अशोभनीय आहे.

नागरिकांना घटनेने दिलेल्या अधिकारांचे हे अवमूल्यन आहे, याचे भान अधिकार्‍यांनी ठेवायला हवे. मनपाकडून वारंवार प्रतारणा होत असल्याने नागरिक विकासकामांमध्ये सहभाग घेत नाहीत. केवळ कार्यालयात बसून व कागदपत्रे रंगवून उद्याने सुस्थितीत राहू शकत नाहीत. कर्मचार्‍यांनी उद्यानांची निगराणी ठेवणे आवश्यक आहे. आपण स्वत: उद्यानांची पाहणी केली, तर अनेक कर्मचार्‍यांवर कारवाईची वेळ येईल. त्यामुळे निगराणी ठेवता येत नसेल, तर जनतेच्या पैशांची उधळपट्टी करून उद्यानांची उभारणी करता कशाला, असा सवाल आसावांनी केला आहे.