आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस गळतीने सिलिंडरचा भडका; धारूरमध्‍ये दहा जण भाजले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धारूर - खानावळीत स्वयंपाकादरम्यान सिलिंडरच्या नळीतून गॅस गळती झाल्याने अचानक भडका होऊन दहा जण भाजले. धारूरमध्ये (जि. बीड) सोमवारी दुपारी दीड वाजता ही घटना घडली. जखमींवर धारूर अंबाजोगाईत उपचार सुरू आहेत. 
 
शहरातील बसस्थानक परिसरात बन्सी मारुती काळे यांचे अमोल भोजनालय ही घरगुती खानावळ आहे. सोमवारी सिलिंडरधून गॅस गळती होऊन अचानक भडका उडाला. यात काळे यांच्या पत्नी विमल काळे (४५), ग्राहक संजय बाळकृष्ण घोळवे (४५), बाळासाहेब राजाभाऊ मुंडे (४०), सुर्यकांत सोनवळकर (२८, तिघेही रा. चारदरी), रामराव अश्रुबा माळेकर (६५ रा. गोपाळपूर), किसन नामदेव चव्हाण (४० रा. अंबाजोगाई) जखमी झाले. विमल या सर्वाधिक ३५% भाजल्या आहेत. 
 
अनर्थ टळला 
काळेयांची ही खानावळ भरवस्तीत अाहे. सिलिंडरचा स्फोट झाला असता तर आणखी मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने हा अनर्थ टळला. 
बातम्या आणखी आहेत...