आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहक भांडारात गॅसटाक्यांचे वितरण सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अहमदनगर मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार, दाणेडबरा येथे गॅस विभागाच्या कामकाजाचे उद्घाटन हिंदुस्थान पेट्रोलियमचे डेप्युटी मॅनेजर नारायण राजवैद्य यांच्या हस्ते ग्राहकांना गॅसटाकी वितरीत करून करण्यात आले.

राष्‍ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर, अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या छाया फिरोदिया, जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे, ग्राहक भांडारचे अध्यक्ष शरद क्यादर, उपाध्यक्ष वैभव लांडगे, राजेंद्र चोपडा आदी यावेळी उपस्थित होते. एचपी कंपनीचे नारायण म्हणाले, ग्राहक भांडारवर ग्राहकांचा विश्वास असल्यामुळेच गॅस वितरणाची सेवा पुन्हा सुरू करण्याची संधी उपलब्ध झाली.