आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरक्षकांवर जमावाचा हल्ला, नगरच्‍या पोलिस ठाण्‍यासमोरच केली मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील आठवडे बाजारातून कत्तलीसाठी नेण्यात येणारे जनावरे पकडून दिल्याप्रकरणी पुण्यातील सात गोरक्षकांवर शनिवारी हल्ला केला. 
 
शिवशंकर राजेंद्र स्वामी (पुणे) त्यांच्या दहा ते बारा सहकाऱ्यांनी शनिवारी काष्टीच्या बाजारातून नगरच्या दिशेने नेण्यात येणाऱ्या १२ गाया पोलिसांच्या मदतीने पकडून दिल्या होत्या. टेम्पो चालक व सहायकाला अटक केली होती. गायी विकणारे व घेणारे दोघांना आरोपी करण्याची शिवशंकर यांची मागणी होती. फिर्याद देण्यासाठी ते श्रीगोंदे ठाण्यात आले होते. सायंकाळी ते पोलिस ठाण्याबाहेर थांबल्यानंतर १५-२० जणांच्या जमावाने शिवशंकर सहकाऱ्यांवर हल्ला केला.

या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पोलिस घटनास्थळी आले. जवळपासच्या टपरीत चहा पित असलेल्या तरुणांना पकडून नेले. या घटनेशी त्यांचा संबंध नसताना पोलिसांनी त्यांना मारहाण केली. नंतर त्यांना सोडून देण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...