आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • General Consul Michael Siebert Will Be Visit To Nagar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जर्मनीशी असलेलं नगरचं नातं अधिक दृढ होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शंभर वर्षांहून अधिक काळापासून जर्मन वस्तू तेथील नागरिकांचे नगरशी ऋणानुबंध जुळले आहे. हे नातं जर्मनीचे भारतातील कौन्सल जनरल मायकेल सिबर्ट यांच्या भेटीने आणखी दृढ होणार आहे. सिबर्ट सोमवारी (१ जून) दोन दिवसांच्या नगर दौऱ्यावर येत आहेत.
मूळचे नगरचे मागील चार दशकांपासून फ्रान्समध्ये स्थायिक असलेले डॉ. शशी धर्माधिकारी यांनी पहिल्या महायुद्धाच्या शताब्दीनिमित्त गेल्या वर्षी नगरच्या भुईकोट किल्ल्यात भरवलेल्या प्रदर्शनातील चित्रे, छायाचित्रे, व्यंगचित्रे, पत्रे अन्य साहित्य असलेले कायमस्वरूपी दालन ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात उभारण्यात आलं आहे. त्याचं उद््घाटन सिबर्ट यांच्या हस्ते सोमवारी सकाळी होणार आहे. जिल्हाधिकारी अनिल कवडे वस्तू संग्रहालयाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. रवींद्र साताळकर हे सिबर्ट यांचे स्वागत करतील.
नगरच्या संग्रहालयात सन १८८५ मध्ये जर्मनीतील स्टुटगार्ट येथे तयार झालेली बीएनसी हेस्परस कंपनीची आगळी-वेगळी सायकल आहे. या सायकलला चेन नाही. मागे-पुढे होणाऱ्या पायडलमुळे मागील चाकाला असलेल्या पुलीला गती मिळून ही सायकला चालते. या सायकलचं पुढील चाक छोटं म्हणजे इंच त्रिज्या असलेलं आणि मागील चाक ११ इंच त्रिज्या असलेलं आहे.

अशा प्रकारची सायकल जगातील अन्य कोणत्याही संग्रहालयात नाही!
संग्रहालयाच्या भेटीनंतर सिबर्ट भुईकोट किल्ल्याला भेट देतील. जर्मन लोकांच्या आठवणी नगरचा किल्ला भिंगारमधील युद्ध छावणीशी निगडित आहेत. पहिल्या दुसऱ्या महायुद्धात अनेक जर्मन नागरिकांना सैनिकांना युद्धबंदी म्हणून नगरच्या छावणीत ठेवण्यात आले होते. किल्ल्यात असताना त्यांच्यातील काही इतिहासप्रेमींनी एक बुरुजाजवळ उत्खनन केल्याची नोंद आहे. जर्मन चित्रकारांनी केलेली काही रेखाटने नगरच्या बिली नगरवाला कुटुंबाकडे आहेत. नगरमध्ये मरण पावलेल्या काही जर्मन नागरिक सैनिकांच्या कबरी बुऱ्हाणनगर रस्त्यावरील दफनभूमीत आहेत.
फराह बख्क्ष महाल, रणगाडा संग्रहालय, तसेच शाह डोंगरावरील चांदबिबी महालालाही सिबर्ट भेट देणार आहेत. जूनला ते दमडी मशीद बोअर युद्धस्मारकाला भेट देतील. नंतर ते अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रजनिश बार्नबस यांना भेटतील. नगर जर्मनीदरम्यान शैक्षणिक देवाण-घेवाणीबाबत त्यांच्यात चर्चा होईल.
पॅन्झर - रॅड
नगरच्या रणगाडा संग्रहालयात जर्मन सैनिकांनी दुसऱ्या महायुद्धात वापरलेले "पॅन्झर - रॅड' हे चिलखती वाहन आहे. नाझी सैन्याचे स्वस्तिक चिन्ह असलेल्या या आठचाकी पॅन्झरचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला दोन्ही दिशेला स्टिअरिंग आहेत. त्याचा वेग ताशी ५३ मैल होता. छोट्याशा गल्लीबोळात जाऊनही तो शत्रूवर अचूक मारा करू शकत असे.
औद्योगिक संबंध
नगरच्या उद्योजकांचे शिष्टमंडळ मध्यंतरी जर्मनीतील जागतिक औद्योगिक प्रदर्शनासाठी गेले होते. या वेळी आर्मी संघटनेचे सरचिटणीस मिलिंद कुलकर्णी यांच्या पुढाकाराने काही जर्मन उद्योजकांशी चर्चा झाली होती. नंतर काही दिवसांतच हे जर्मन उद्योजक नगरला येऊन गेले. यानिमित्ताने नगर जर्मनीदरम्यान औद्योगिक संबंधही प्रस्थापित झाले आहेत.