आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेवराई गोळीबार प्रकरण; मुख्य आरोपी जेरबंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे - गेवराई येथील ग्रामसभेत झालेले गोळीबार प्रकरण पाचेगाव येथील दरोड्यातील मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांना यश आले. ग्रामसभेत सरपंचाच्या पतीच्या डोक्याला गावठी कट्टा लावून हवेत गोळीबार करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी संदीप कर्डिले याला पोलिसांनी अटक केली. पाचेगाव येथे सुपारी घेऊन दरोड्याचा बनाव करणारा मुख्य आरोपी यासीन खा ऊर्फ यश्या ऊर्फ अनिल शिवाजी भोसले यालाही अटक करण्यात आली. आरोपीकडून गावठी कट्टा मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव, उपअधीक्षक दत्तात्रय कांबळे, निरीक्षक सुरेश शिंदे सहायक निरीक्षक शरद गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल बाबा लबडे, अण्णा डाके, घुगरकर, पोलिस नाईक सुनील शिरसाठ, बाळासाहेब बैरागी, संदीप दिवटे, अरुण शेकडे, संदीप दंरदले, अमोल आजबे, बाळासाहेब नागरगोजे, योगेश भिंगारदिवे यांच्या पथकाने आरोपींना पकडले.