आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घनश्याम शेलारांचा आज शिवसेनेत प्रवेश?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी पक्षाला रामराम ठोकला अाहे. शनिवारी (५ मार्च) ते मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून शुक्रवारी समजली.
शेलार यांनी निवडणुकीपूर्वीही राष्ट्रवादीला सोडचिठी दिली होती. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीने ते माघारी फिरले. राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांच्या प्रचारात ते आघाडीवर होते. निकालानंतर त्यांच्यात दुरावा निर्माण वाढत गेला. राष्ट्रवादीने विधान परिषदेसाठी दिलेला शब्द पाळल्याने ते अन्य पर्याय शोधत होते. श्रीगोंद्यात शिवसेनेला आलेली मरगळ विचारात घेऊन उत्तम संघटन कौशल्य असलेल्या शेलार यांना शिवसेनेत बोलावणे पाठवले होते. मुंबईत शनिवारी "मातोश्री'वर त्यांचा प्रवेश होणार आहे. या माहितीला शेलार यांच्या येथील निकट वर्तुळातून शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरून दुजोरा मिळाला.

प्रवेशाबाबत कमालीची गुप्तता
शिवसेनेतप्रवेश करण्यासंबंधीची हालचाल शेलार शिवसेनेने गुप्त ठेवली. मुहूर्तसुद्धा कोणाला कळू दिला नाही. शुक्रवारी शेलार यांचा मोबाइल 'स्विच ऑफ' होता. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही फोनला प्रतिसाद दिला नाही. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी पुन्हा शिवसेना हे शेलार यांचे राजकीय वर्तुळ पूर्ण झाल्याची चर्चा ऐकायला मिळाली.