आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकप्रतिनिधींचा यंत्रणेवर धाक नसल्याने अधिकाऱ्यांची मनमानी; घनश्याम शेलार यांची टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे- रास्तारोको आंदोलन करून लोकांची अडवणूक करण्यात मला आनंद नाही. परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नसून जलसंपदा विभागाला याचे काही देणे घेणे नाही. तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेवर लोकप्रतिनिधींचा धाक नसल्यामुळे अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे, अशी टीका शिवसेनेचे जिल्हा समन्वयक घनश्याम शेलार यांनी केली. 

‘कुकडी’च्या आवर्तनात एक टीएमसी पाणी वाढवून द्यावे. ते शेतीसाठी सोडण्यात यावे. तसेच घोडचे चौथे आवर्तन मिळावे या प्रमुख मागणीसाठी सोमवारी श्रीगोंद्यात शिवसेनेच्या वतीने घनश्याम शेलार यांच्या नेतृत्वाखाली दौंड-जामखेड रस्त्यावर सरस्वती नदीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेलार बोलत होते. ते म्हणाले, आता पिण्याच्या पाण्यापेक्षा शेतीसाठी पाणी गरजेचे असताना फक्त पिण्यासाठी पाणी सोडून शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी काष्टी, वांगदरी, पिंपळगाव पिसाच्या तीन दादांचा धसका घेतला असून त्यांच्या भीतीपोटी शेतकरी आंदोलनासाठी समोर येत नाहीत. 

काही दिवसांपूर्वी एका दादांनी पिकांना पाणी मिळणारच, असे सांगितले होते. पण आता पाण्याऐवजी पोलिसांची काठी दिसणार आहे. शेतकरी शेतीसाठीच पाणी मागतो तो काय गांजा पिकवत नाही. शेलार यांनी यावेळी जलसंपदा विभागाचे उपअभियंता थॉमस मेमन यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय आनंदकर, श्रीपाद ख्रिस्ती, सुनीता हिरडे, अण्णासाहेब थिटे, अॅड. सुनील भोस, भाऊसाहेब गोरे, प्रकाश निंभोरे यांची भाषणे झाली. सोमवारी बैठकीत शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यास मंगळवारी (२५ एप्रिल) तहसील किंवा कुकडी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण करणार असल्याचे शेलार यांनी सांगितले. 

राम शिंदे मंत्रिपद फार दिवस टिकत नाही 
पालकमंत्रीराम शिंदेंवर टीका करताना शेलार म्हणाले, पालकमंत्री राम शिंदे हे पोलिस बंदोबस्तात कर्जत-जामखेडला पाणी नेतात. त्यामुळे त्यांनी फक्त कर्जत-जामखेडचे पालकमंत्री होता संपूर्ण जिल्ह्याचे पालकमंत्री बनावे. कारण मंत्रिपद फार दिवस टिकत नसते. आमच्या तालुक्यातील नेत्यांना आज नुसते फिरण्याची वेळ आली आहे. 
बातम्या आणखी आहेत...