आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोडेगाव ग्रामपंचायतीमध्‍ये पदाधिकारी निवडीदरम्यान तणाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नेवासे तालुक्यातील घोडेगावच्या सरपंचपदी आमदार गडाख गटाच्या पुष्पा संदीप कुर्‍हाडे यांची, तर उपसरपंच म्हणून घोडेगाव विकास आघाडीच्या पारस चोरडिया यांची निवड झाली. उपसरपंचपदाच्या निवडणुकीत गडाख गटाच्या दोन सदस्यांची मते फुटल्यामुळे तणाव निर्माण झाला. निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब धाडगे व मंडल अधिकारी आबा ढेरे यांच्या उपस्थितीत निवडणूक झाली. सरपंचपदासाठी कुर्‍हाडे व विकास आघाडीच्या वंदना सोनवणे यांना समान मते पडली. चिठ्ठीद्वारे कुर्‍हाडे विजयी झाल्या. उपसरपंचदासाठी गडाख गटाचे अजय सोनवणे व विकास आघाडीचे चोरडिया यांच्यात लढत झाली. गडाख गटाचे दोन सदस्य फुटल्यामुळे चोरडियांना विजयी घोषित करण्यात आले. त्यामुळे तणाव निर्माण झाला.