आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील जनआक्रोशाचे वादळ भाजपची सत्ता उलथवून लावेल; गुलाम नबी आझाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- ‘शेतकरी व सामान्य नागरिकांविराेधी निर्णय घेणाऱ्या केंद्र व राज्यातील भाजप सरकारविराेधात निर्माण झालेले जनआक्रोशाचे वादळ देशाची फसवणूक करणाऱ्या मोदी सरकारची सत्ता उलथवून लावेल,’ असा इशारा काँग्रेसचे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाब नबी आझाद यांनी मंगळवारी दिला. काँग्रेसतर्फे नगरमध्ये अायाेजित जनआक्रोश मेळाव्यात ते बोलत होते.
काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अामदार अब्दुल सत्तार अादी उपस्थित हाेते.
 
‘इंग्रजांपासून देशाला मुक्त करण्याचे काम काँग्रेसने केले, आता भाजपपासून देशाला मुक्ती देण्याचे काम करायचे आहे. राज्यात शेतकरी मरत असताना भाजप जल्लोष करतेय. शेतकऱ्यांची कर्जमाफीतही फसवणूक झाली. हे तर ‘फसवणूक’ सरकार अाहे,’ असे अशाेक चव्हाण म्हणाले.
 
काँग्रेसचे केंद्रीय नेते अडकले इतिहासातच
काँग्रेसचे केंद्रीय नेते गुलाम नबी आझाद व महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांची भाषणे कॉंग्रेसच्या इतिहासातच अडकून पडल्याने ती रटाळ झाली. त्यामुळे श्राेतेही कंटाळले हाेते.  मोहन प्रकाश यांचे भाषण सुरू असतानाच लाेकांनी खुर्च्या सोडण्यास सुरुवात केली. त्यानंतर आझाद यांच्या भाषणाच्या वेळी तर मागील रांगा रिकाम्या झाल्या होत्या.  आझाद व मोहन प्रकाश यांनी अापल्या भाषणात अनेकदा मुंबईचा उल्लेख ‘बंबई’ असा केला.
 
‘मातोश्री’च्या  शेळ्या ‘वर्षा’वर : विखे
शिवसेना सरकारमध्ये सहभागी आहे की बाहेर, हे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करावे. त्यांनी अात्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शेळ्या दिल्या. मात्र, आता ‘मातोश्री’वरील शेळ्या वर्षा बंगल्यावर चरायला गेल्या आहेत. सरकारचे तीन तेरा अन् नऊ बारा वाजले आहेत, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. तर निवडणूक काळात प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन माेदींनी दिले होते. तुमच्याकडे १५ लाख नसतील, तर १५ हजार रुपये तरी द्या, असे मोहन प्रकाश म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...