आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेवाशात राष्ट्रवादीला घरचा आहेर; घुले यांची उपसरपंचपदी निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे - नेवासे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडीत श्रेष्ठींचा आदेश धुडकावत राष्ट्रवादीच्या ४ सदस्यांनी शिवसेनेच्या गोरख घुले यांना निवडून आणले. ग्रामपंचायतीत १७ पैकी १२ सदस्य राष्ट्रवादीचे आहेत.

रोटेशनप्रमाणे उपसरपंच व सरपंचपद फिरवण्यात येणार आहे. उपसरपंच फारुक आतार यांनी श्रेष्ठींच्या आदेशाने राजीनामा दिल्याने शुक्रवारी निवडणूक झाली. १७ पैकी सेनेचे केवळ गोरख घुले आहेत. अपक्ष एकता मंडळाचे ३, भाजपचा १ असे बलाबल आहे. सरपंच सुशीला लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. राष्ट्रवादीकडून माजी सरपंच नंदकुमार पाटील, योगेश रासने व सुनील धायजे यांनी अर्ज भरले होते. विरोधकांकडून केवळ गोरख घुले यांचा अर्ज होता. राष्ट्रवादीचे धायजे आणि सेनेचे घुले यांच्यात लढत झाली. घुले एका मताने विजयी झाले. धायजे यांना ८, तर घुले यांना ९ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या १२ पैकी ४ सदस्यांना फोडण्यात घुलेंना यश मिळाले. सकाळी ज्येष्ठ नेते विश्वास गडाख यांच्यासमवेत सर्व सदस्यांची बैठक झाली होती. पण सदस्यांनी श्रेष्ठींचे आदेश झुगारले.