आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘घुमा'चे खडकीमध्ये चित्रीकरण, पारनेर नगर तालुक्यात होणार उर्वरित शूटिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आर्थिक उदारीकरणानंतर ग्रामीण भागात होणाऱ्या बदलांवर भाष्य करणाऱ्या ‘घुमा’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला रविवारी सुरुवात झाली. मास फिल्म प्रॉडक्शन ड्रीम सेलर फिल्म्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त महेश रावसाहेब काळे करत अाहेत.

चित्रीकरणाचा प्रारंभ नगर तालुक्यातील खडकी गावात झाला. पुढील महिनाभर सारोळा कासार, बाबुर्डी बेंद आदी विविध ठिकाणी चित्रीकरण करण्यात येणार आहे. मास फिल्म प्रॉडक्शनचे निर्माते मदन आढाव ड्रीम सेलर फिल्म्सचे रावसाहेब काळे यांच्या हस्ते खडकी येथे चित्रीकरणास प्रारंभ करण्यात आला. यावेळी आदिनाथ धानगुडे, संतोष इंगळे, सारंग बारस्कर, पंचायत समितीचे सभापती संदेश कार्ले, खडकीच्या सरपंच अर्चना प्रवीण कोठुळे, सारोळा कासारचे सरपंच रवींद्र कडूस, शरद कोठुळे, बापूराव कोठुळे, महेश कोठुळे, रोहिदास भिंगारदिवे, जितेंद्र निकम, मच्छिंद्र कोठुळे, रेवणनाथ कोठुळे आदी उपस्थित होते.

या चित्रपटाचे लेखन महेश काळे यांचे अाहे. छायाचित्रण योगेश कोळी करत आहेत. यात स्थानिक कलाकारांना संधी देण्यात आली आहे. भारतीय चित्रपट उद्योगास शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माहिती प्रसारण मंत्रालयाने सुरू केलेल्या विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महेश काळे यांच्या रुपया या लघुपटास कोलकता येथे झालेल्या दुसऱ्या राष्ट्रीय लघुपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले होते.

दिग्दर्शक महेश काळे न्यू आर्ट््सचे विद्यार्थी
नगर येथील जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या न्यू आर्ट््स कॉलेजचा तिसरा विद्यार्थी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. याआधी ‘फॅण्ड्री’ ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे, ‘ख्वाडा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे या दोन विद्यार्थ्यांनी चित्रसृष्टीत मोठे यश मिळवले आहे. महेश काळे हा तिसरा विद्यार्थी ‘घुमा’ या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रसृष्टीत पदार्पण करत आहे. या महाविद्यालयाचे अन्य विद्यार्थीही चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात सध्या कार्यरत आहेत.
बातम्या आणखी आहेत...