आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीने दर्शन घेतल्याचे प्रकरणी; दूध, तेलाने अभिषेक करून शनिदेवाची महाआरती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे (नगर)- अनेक वर्षांची परंपरा मोडीत काढत एका तरुणीने शनिवारी नेवासे तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे चौथऱ्यावर जाऊन शनैश्वराचे दर्शन घेतले. या घटनेचे पडसाद रविवारी शिंगणापूर येथे उमटले. ग्रामस्थांनी काही काळ बंद पाळून निषेध सभा घेतली. दरम्यान, या घटनेला जबाबदार धरून देवस्थानच्या सात सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.
शनिदेवाच्या शिळेवर दूध आणि तेलाचा अभिषेक करून महाआरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांचे दर्शन सुरू करण्यात आले.

घरांना दारे नसलेल्या व कधीच चोरी होत नाही, यासाठी प्रसिद्ध असलेल्या शनिशिंगणापूरमधील शनैश्वराच्या चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास महिलांना परंपरेनुसार मनाई आहे. गेल्या दहा वर्षांपासून पुरुष भाविकही खालूनच दर्शन घेतात. महिलांनाही दर्शन घेता यावे, यासाठी सन २००० मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीने "चला शिंगणापूरला चोरी करायला' हे आंदोलनही केले. पण ग्रामस्थ व भाविकांनी ते हाणून पाडले होते. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास एका तरुणीने सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाचे दर्शन घेतले. तिने तेलही वाहिले. शनिवारमुळे परिसरात मोठी गर्दी होती. ही गोष्ट लक्षात येताच चौथऱ्याजवळील भाविक व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अारडाओरडा केला. त्यामुळे ती तरुणी लगेच निघून गेली. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचे स्वागत केले, तर ग्रामस्थांनी असंतोष व्यक्त केला.
रविवारी शिंगणापूरमध्ये बंद पाळण्यात आला. सकाळी साडेआठ ते साडेनऊदरम्यान सरपंच बाळासाहेब बानकर यांच्या अध्यक्षतेखाली गावकऱ्यांनी निषेध सभा घेतली. या सभेस गावातील सर्व पुरुष व महिला उपस्थित होत्या. विश्वस्त व अधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याची मागणी बाळासाहेब बनकर यांनी केली. डॉ. रावसाहेब बानकर, बाळासाहेब बोरुडे, दादासाहेब घायाळ, विश्वस्त साईराम बानकर आदींचीही भाषणे झाली. नंतर गावकऱ्यांनी ब्रह्मवृंदाच्या हस्ते दूध आणि तेलाचा अभिषेक करून शनिदेवाची महाआरती केली. भाविकांसाठी पुकारलेला गाव बंद नंतर मागे घेण्यात आला.

विश्वस्त साईराम बानकर राजीनामा देणार : शनिशिंगणापूर येथे रविवारी ग्रामस्थांच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली. या सभेला शनैश्वर देवस्थान मंडळाचे एकमेव विश्वस्त साईराम बानकर यांनी गावकऱ्यांनी केलेल्या आवाहनानुसार व झालेल्या घटनेचा निषेध म्हणून मी राजीनामा देत आहे, असे जाहीर केले. त्यामुळे अन्य विश्वस्त या प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मंडळाची मुदत संपतेय, हा बदनामीचा प्रयत्न
शनैश्वर देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळाची मुदत संपत असल्याने हा वाद वाढवून देवस्थानला बदनाम करण्याचे कारस्थान विरोधकांनी केले. प्रकरणातील दोषी सात सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित केले अाहे. शिवाजीराव दरंदले, अध्यक्ष, देवस्थान समिती, शिंगणापूर.

ते साडेनऊदरम्यान सरपंच बाळासाहेब बानकर यांच्या अध्यक्षतेखाली गावकऱ्यांनी निषेध सभा घेतली. या सभेस गावातील सर्व पुरुष व महिला उपस्थित होत्या. विश्वस्त व अधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याची मागणी बाळासाहेब बनकर यांनी केली. डॉ. रावसाहेब बानकर, बाळासाहेब बोरुडे, दादासाहेब घायाळ, विश्वस्त साईराम बानकर आदींचीही भाषणे झाली. नंतर गावकऱ्यांनी ब्रह्मवृंदाच्या हस्ते दूध आणि तेलाचा अभिषेक करून शनिदेवाची महाआरती केली. भाविकांसाठी पुकारलेला गाव बंद नंतर मागे घेण्यात आला.

पुढील स्‍लाइडवर वाचा मंडळाची मुदत संपत असल्याने बदनामीचा प्रयत्न