आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - केडगाव येथील आठ वर्षांच्या मुलीच्या निर्घृण खूनप्रकरणी कोतवाली पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. दोन स्वतंत्र पथकांच्या साह्याने मारेकर्यांचा शोध सुरु आहे. सोमवारी दुपारी साडेतीन वाजता मृत श्रुतिका थोरात हिच्यावर केडगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
केडगाव येथील वैष्णवनगर परिसरातील तिरंगा चौकातून 20 ऑक्टोबरला श्रुतिकाचे अपहरण करण्यात आले होते. 27 ऑक्टोबरला दुपारी तिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह नेप्ती उपबाजार परिसरात आढळला. डीएनए चाचणी व शवविच्छेदन पुण्यातील ससून रुग्णालयात करण्यात आले. घातपातानेच तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शवविच्छेदन व डीएनए चाचणीचा अहवाल मिळाल्यानंतर आणखी माहिती मिळू शकेल.
दरम्यान, केडगाव परिसरातील दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना बरोबर घेऊन दोन स्वतंत्र पथके तपास करत असल्याची माहिती तपासी अधिकारी दीपक बर्डे यांनी दिली. लवकरच मारेकरी गजाआड होईल, असा विश्वासही त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला.
श्रुतिकाच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास केडगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नगरसेवक शिवाजी लोंढे, अजय आजबे यांच्यासह वैष्णवनगर परिसरातील नागरिक, विशेषत: महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. स्थानिक नगरसेवक, उपमहापौर व महापौरपदी महिला असतानाही याप्रसंगी त्यांच्यापैकी कोणीही उपस्थित नसल्याने महिलांनी नाराजी व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.