आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसमध्ये युवतीला दमदाटी; अदखलपात्र गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- संगमनेरहून बारामतीला निघालेल्या युवतीला बसमध्ये शिवीगाळ व दमदाटी करण्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला. तारकपूर बसस्थानकात प्रवासी उतरल्यानंतर समयसूचकता दाखवत चालक-वाहकांनी बस तोफखाना पोलिस ठाण्यात नेली. पोलिसांनी या युवतीच्या फिर्यादीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
दत्तात्रेय माधव जुन्नरकर असे शिवीगाळ करणार्‍या व्यक्तीचे नाव असून तो वैद्यकीय सेवेशी निगडित आहे.
संगमनेरहून बारामतीकडे निघालेल्या बसमध्ये शेजारी बसलेल्या युवतीने त्यांना ‘नीट बसा’ असे म्हटले. याचा राग येऊन जुन्नरकर यांनी या युवतीला शिवीगाळ व दमदाटी केली. संबंधित तरुणीने ही माहिती वाहकाला दिली. तारकपूर बसस्थानकावर प्रवासी उतरल्यानंतर बस थेट तोफखाना पोलिस ठाण्यात नेण्यात आली. युवती व चालक-वाहकाने तक्रार नोंदवून घेण्याबाबत पोलिसांना विनंती केली.