आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी नगरसेवकाच्या मुलीचे अपहरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पिस्तुलाचा धाक दाखवून एका तरुणीचे अपहरण करण्यात आले. याबाबत मुलीच्या वडिलांनी सदर बझार पोलिसात मंगळवारी फिर्याद दिली आहे. संबंधित तरुणी माजी नगरसेवकाची मुलगी आहे.

चिरंजीवी लक्ष्मण जाधव, ऑगस्टिन मरेड्डी, शिवा जाधव, शुभम उपाध्ये, लक्ष्मण जाधव यांच्यासह वीस तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे. आंबेडकरनगर (अंत्रोळीकरनगर जवळ) येथे पीडित मुलीची मोठी बहीण राहते. तिच्या घरातून मुलीला गाडीतून पळवून नेले. घरात घुसून मुलीला व मेव्हुणीला शिवीगाळ करून पिस्तुलाचा धाक दाखवण्यात आला. लक्ष्मण जाधव यांच्या सांगण्यावरून पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना 6 ऑक्टोबर रोजी घडली आहे. साहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र थोरात तपास करीत आहेत. अद्याप कोणालाही अटक झाली नाही.