आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीचे अपहरण प्रकरण: पीडित युवतीसह पोलिस आज शिरपूरला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- तरूणीचे अपहरण करून तिला शिरपूरच्या कुंटणखान्यात वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पीडित तरुणीसह पोलिसांचे पथक शुक्रवारी (18 जानेवारी) शिरपूरला जाणार आहे.

3 जानेवारीला ही घटना घडली होती. याबाबतचा गुन्हा तोफखाना ठाण्यात दाखल आहे. तपास सहायक पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग करीत आहेत.

पीडित तरुणी व तिचा भावी पतीची बुधवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली, तसेच घटनास्थळाची पडताळणी करण्यात आली.

मारहाणीची चौकशी
पीडित तरुणी व तिचा भावी पती एका पोलिस कर्मचार्‍यासह फिर्याद दाखल करण्यासाठी 9 जानेवारीला नगरला आल्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी तिला पट्टयाने मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली होती. पुण्याला परतल्यानंतर संबंधित तरुणी व तिच्या भावी पतीने तसे जबाब पोलिसांना दिले. या तक्रारीची पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी चौकशी सुरू केली असून, तोफखाना पोलिस ठाण्याच्या ठाणे अंमलदार व मदतनिसाला जबाबासाठी शुक्रवारी बोलावण्यात आले होते.