आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चाइल्डलाइनमुळे वाचला मुलीचा जीव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नऊ वर्षांच्या मुलीला आत्याने व तिच्या मुलाने अमानुष मारहाण केली. गुरुवारी रात्री पाइपलाइन रस्त्यावर घडलेल्या या घटनेची माहिती कळताच ‘चाइल्डलाइन’च्या कार्यकर्त्यांनी तेथे जाऊन मुलीची सुटका केली. तोफखाना पोलिसांनी महिला व तिच्या मुलाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेतले आहे.

ज्या मुलीला मारहाण झाली, ती पूर्वी आजीकडे राहत होती. काही दिवसांपूर्वीच ती आत्याकडे राहायला आली. किरकोळ कारणावरून आत्या व तिच्या मुलाने या चिमुकलीला कोंडून काठीने मारहाण केली. तिच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकण्यात आली. मुलीचा आरडाओरडा ऐकून एका नागरिकाने या घटनेची माहिती चाइल्डलाइनला कळवली. खोलीचा पत्रा उचकटून या मुलीची सुटका करण्यात आली. मारहाणीमुळे मुलीचे हात सुजले असून तसेच डोक्यालाही इजा झाली आहे. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.