आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give Support To Farmers In District Declared Drought

जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- "नगरिजल्ह्यावर घोंगावतेय दुष्काळाचे सावट' हे वृत्त "दिव्य मराठी'ने मंगळवारी प्रसिध्द करताच त्याची दखल खासदार दिलीप गांधी यांनी घेऊन दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना दिलेल्या निवेदनात खासदार गांधी यांनी म्हटले आहे, जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने दोन लाखांहून अधिक हेक्टर क्षेत्रावरील खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या अाहेत. पावसाअभावी पेरणी झालेली पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. विहिरी, तलाव धरणांतील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे.
जिल्ह्यातील लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी जुलैपर्यंत लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. १५ जूनपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस समाधानकारक असला, तरी गेल्या २० दिवसांपासून पावसाने आेढ दिल्याने खरिपाची पिके जळू लागली आहेत. पाऊस थांबल्याने सुमारे लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्याही लांबणीवर पडल्या आहेत.
येत्या आठ दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्यास जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पसरणार आहे. याबाबत "दिव्य मराठी'ने प्रसिध्द केलेल्या वृत्ताची दखल खासदार गांधी यांनी गांभीर्याने घेतली. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाने आेढ दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सध्या दुष्काळजन्य परिस्थिती दिसत आहे.
टँकरची मुदत ३० जूनला संपल्यानंतर शासनाने जुलैपर्यंत टँकर सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. पाऊस नसल्याने शासनाने शेतकऱ्यांना दिलासा म्हणून दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना क्षेत्रानुसार आर्थिक मदत करावी. तसा आराखडा पंचनामे तातडीने करावेत. भविष्यात पाऊस झाला, तर शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे खतांचा पुरवठा करावा. शेतकऱ्यांबरोबर जनावरांनादेखील दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी छावण्या मंजूर कराव्यात.
कृषी विद्यापीठाला चारा तयार करण्याच्या सूचना द्याव्यात. शासनस्तरावर दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. शेतकरी जगला पाहिजे. सध्या पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ तोंड वर काढत आहे. नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळणे गरजेचे आहे. याबाबत शासकीय स्तरावर तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी खासदार गांधी यांनी केली आहे.
...तर शेतकरी रस्त्यावर उतरेल
पावसानेआेढ दिल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती िनर्माण झाली आहे. त्याची झळ शेतकऱ्यांना सहन करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून पॅकेज द्यावे. पाण्याबाबत िनर्णय घ्यावा; अन्यथा शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरेल.'' दिलीप गांधी, खासदार.