आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनदायी योजनेला पोस्टाचा आधार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे, त्यांना विनाशुल्क योग्य ते उपचार मिळावे. या दृष्टिकोनातून राजीव गांधी जीवनदायी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात या योजनेचे पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या हस्ते रविवारी (26 जानेवारी) सकाळी साडेनऊ वाजता मुख्य डाकघर येथे लाभार्थ्यांना या योजनेचे आरोग्य पत्र वाटप करून उद्घाटन होणार आहे.
या योजनेत निवडक जीवघेण्या आजारांवर उपचारासाठी पिवळे, केशरी रेशनकार्डधारक तसेच अन्नपूर्णा, अंत्योदय अन्न योजनेचे कार्डधारकांच्या कुटुंबांना आर्थिक साहाय्य मिळेल. या विम्यासाठीची संपूर्ण रक्कम शासनाने भरली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा रुग्णालय व इतर 25 रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी निवडक 971 उपचारांसाठी लाभधारक कुटुंबाला दीड लाखांपर्यंतचा देण्यात येणार आहे. या योजनेच्या आरोग्य पत्राचे वाटप जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र व ग्रामपंचायतस्तरावर संग्राम केंद्र माध्यमातून सुरू आहे. रविवारी पिचड यांच्याहस्ते आरोग्य पत्र वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.