आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्लोबल वॉर्मिंगमुळे भविष्यकाळ अवघड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जंगलतोड मोठ्या प्रमाणात होत असल्याने निसर्गाबरोबरच समाजाचाही समतोल बिघडत चालला आहे. वृक्षतोड प्रदूषणामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न गंभीर बनला असून, मनुष्याचा भविष्यकाळ अवघड असल्याचे प्रतिपादन प्रधान जिल्हा न्यायाधीश विनय जोशी यांनी केले.

शहर वकील संघातर्फे आयोजित "कार्बन फार्मिंग अगेन्स्ट ग्लोबल वॉर्मिंग' या उपक्रमांतर्गत जिल्हा न्यायलयात न्यायाधीश, वकील पक्षकार यांना आंब्याच्या एक हजार रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष अॅड. एम. एम. पाटील, महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अशोक पाटील, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, सचिव अॅड. अभिषेक भगत, उपाध्यक्ष अॅड. मंगेश सोले आदी यावेळी उपस्थित होते.

जोशी म्हणाले, आंब्याची रोपे वाटण्याचा उपक्रम कौतुकास्पद अाहे. दिलेली रोपे लहान मुलाप्रमाणे वाढवावीत. प्रास्ताविक एम. एम. पाटील यांनी केले. वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी जीवनातील वृक्षाचे महत्त्व सांगून वृक्षारोपण संवर्धनासाठी आवाहन केले. यावेळी अॅड. अशोक कोठारी, अॅड. संदीप जावळे, अॅड. सुभाष काकडे, अॅड. विजय भगत, अॅड. नीलेश हराळे, अॅड. सुरेश लगड, अॅड. नरेश गुगळे, अॅड. कारभारी गवळी, अॅड. सतीश गुगळे, माजी अध्यक्ष अॅड. शिवाजी कराळे, अॅड. सतीश निंबाळकर, अॅड. लक्ष्मण पोकळे आदींसह न्यायाधीश, वकील पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहर वकील संघाच्या वतीने 'कार्बन फार्मिंग अगेन्स्ट ग्लोबल वॉर्मिंग' या उपक्रमांतर्गत आंब्याच्या रोपांचे वाटप करताना प्रधान जिल्हा न्यायधीश विनय जोशी. समवेत अॅड. एम. एम. पाटील, अॅड. अशोक पाटील, अॅड. सतीश पाटील, अॅड. अभिषेक भगत, अॅड. मंगेश सोले आदी.
बातम्या आणखी आहेत...