घटत्या सोन्याला लाभला / घटत्या सोन्याला लाभला गुरुपुष्यामृताचा मुहूर्त

बंडू पवार

Oct 20,2011 11:45:15 AM IST

नगर - दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि सोन्याचे भावही 400 रुपयांनी घसरले आहेत. याचाच फायदा घेत ग्राहक उद्या गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सोने आणि चांदी खरेदीच्या तयारीत आहेत. नगर शहरात उद्या किमान 10 कोटी रुपयांची उलाढाल होईल, अशी सराफ व्यावसायिकांना अपेक्षा आहे.
दसरा आणि दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी होत असते. काही महिन्यांपूर्वी सोने दिवाळीत 30 हजार रुपयांपर्यंत जाईल असे बोलले जात होते. पण तसे चित्र सध्या दिसत नाही. उलट दर काहीसे कमीच होत आहेत.
दिवाळीसाठी नगरचा सराफबाजार सज्ज झाला आहे. सोने खरेदी ही सुरक्षित गुंतवणूक असल्याने सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत होते. तथापि, शेअरबाजारातील चढउतारामुळे बुधवारी काही प्रमाणात सोने उतरले. मंगळवारी नगरच्या बाजारात सोन्याचा भाव 10 ग्रॅमचा दर 27 हजार 300 रुपये होता. बुधवारी सोन्याच्या भावात 400 रुपयांनी घट होऊन तो 26 हजार 900 रुपये झाला. गेल्यावर्षी याच सुमारास सोने 19 हजार रुपये होते.
गुरुपुष्यामृताचे महत्त्व
सोने खरेदीसाठी गुरुपुष्यामृताच्या मुहूर्ताला शुभ मानले जाते. या दिवशी सोने खरेदी केल्यास कायम भरभराट होते, तसेच समाधान लाभते असा विश्वास आहे.
४नगरमध्ये सुमारे 70 लहान-मोठ्या सुवर्णपेढ्या आहेत. गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर 10 कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. दिवाळी व बोनसमुळे बाजारात चैतन्य आहे. ग्राहकांसाठी अनेक योजना जाहीर केल्या असून त्यामुळेही मोठी उलाढाल होईल अशी आशा आहे. आनंद कोठारी, चंदूकाका सराफ, नगर
27,300
रुपये हा सोन्याचा मंगळवारचा भाव
26900
रुपये हा सोन्याचा बुधवारचा भाव
19000
गतवर्षी याच काळातील सोन्याचा भाव

X
COMMENT