आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यशस्वी होण्यासाठी चांगले संस्कार हवे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होणे गरजेचे आहे. शिक्षण महर्षी ग. ज. चितांबर यांचा आदश्र विद्यार्थी व शिक्षकांनी समोर ठेवावा, असे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व ‘डांगे पॅटर्न’चे प्रणेते प्राचार्य इंद्रभान डांगे यांनी सांगितले.
नव विद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी ग. ज. चितांबर विद्यामंदिरच्या सुलोचना सुधाकर भोपे सभागृहात गुरुवारी झालेल्या चितांबर जन्मशताब्दी वर्षाच्या उद्घाटन सोहळ्यात डांगे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरस्वती मंदिर रात्र प्रशालेचे माजी मुख्याध्यापक भालचंद्र कलवडे, मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, मानद सचिव अँड. सतीश भोपे, सहसचिव उषा देशमुख, विजय देवचके, श्रीकांत चितांबर, सुरेश चितांबर, मुख्याध्यापिका रंजना जोशी आदी उपस्थित होते.

डांगे म्हणाले, चितांबर सरांचे कर्तृत्व सतत स्मरणात ठेवून हा वारसा पुढे चालू ठेवणे महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने युवापिढीसमोर चांगले आदश्र निर्माण करण्यात आपण अयशस्वी ठरलो आहोत. प्रास्ताविक अँड. भोपे यांनी केले. संस्थेतर्फे आयोजित घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. प्रशांत कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.