आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगले काम करणाऱ्यांचा भाजपत सन्मान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त पक्षाच्या शहर कार्यालयात शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या उपस्थितीत ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला.
नगर - सत्ता आली म्हणून हुरळून जाता केंद्र राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. जे चांगले काम करतील, त्यांचा पक्षात निश्चितच सन्मान केला जाईल, असे आश्वासन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी दिले.

भाजपच्या स्थापना दिनानिमित्त शहर- जिल्हा भाजपच्या वतीने पक्षाच्या कार्यालयात ज्येष्ठ सदस्य मधुसूदन मुळे, अच्युतराव पिंगळे, एल. जी. गायकवाड, नरेंद्र कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जगन्नाथ निंबाळकर, अशोक गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, आदित्य देशपांडे, वैभव जोशी, महेश नामदे, अशोक कानडे, नितीन थोरात, भरत आगरकर, धनंजय जामगावकर, प्रवीण ढोणे, विनोद भिंगारे, अनिल सबलोक, श्याम पिंपळे, महेश तवले, कन्हैया व्यास, विजय घासे, छाया राजपूत,निता देवराईकर, ज्ञानेश्वर काळे आदी यावेळी उपस्थित होते.

आगरकर म्हणाले, जनसंघापासून भाजपच्या स्थापनेदरम्यानचा प्रवास खूप खडतर होता. कार्यकर्त्यांच्या आधाराशिवाय पक्ष उभा राहू शकत नाही. श्यामाप्रसाद मुखर्जी, वसंतराव भागवत यांच्यासारख्या अनेक मंडळींनी पक्ष उभा केला. आज केंद्रात राज्यात भाजपची सत्ता आहे. ही सत्ता सहजासहजी मिळालेली नसून, त्यात अनेकांचे योगदान आहे. भाजपच्या एवढ्या मोठ्या प्रवासात अनेकांनी बलिदान दिले आहे. अशा तन-मन-धनाने काम करणाऱ्यांना विसरुन चालणार नाही. मुळे म्हणाले, शहर जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपची वाटचाल पक्षाचा जन्म कसा झाला, हे समजावून घेणे आवश्यक आहे.