आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gopinath Munde And Balasaheb Vikhe News In Marathi, Divya Marathi, Nagar

गोपीनाथ मुंडे, विखेंची नगरच्या प्रचाराकडे पाठ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे व भाजपचे गोपीनाथ मुंडे हे नगर मतदारसंघात अजून फिरकले नाहीत. या दोन्ही नेत्यांनी प्रचाराकडे पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.शिर्डीतील आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे विखेंचेच उमेदवार असल्याचा प्रचार सुरू असला, तरी वाकचौरेंच्या जाहीर प्रचारात विखेंनी उशिरा उडी घेतली. नगर मतदारसंघातून विखे यांनी यापूर्वी निवडणूक लढवली आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात त्यांची स्वत:ची यंत्रणा आहे, तरीही विखे अजून नगरकडे फिरकले नाहीत. मोदी लाटेचा धसका घेतलेल्या आघाडीच्या नेत्यांनी त्यांना राज्याच्या प्रचारात सहभागी करून घेण्याचेही टाळले आहे. किमान जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत ते पूर्ण ताकदीने उतरतील अशी अपेक्षा होती. मात्र, विखे यांनी नगरकडेही दुर्लक्ष केले.
मुंडे यांनीही नगरकडे पाठ फिरवली आहे. लालकृष्ण अडवाणी यांच्या सभेप्रमाणेच मोदींच्या सभेलाही त्यांनी दांडी मारली. किमान पाथर्डी मतदारसंघात त्यांची एखादी सभा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. खासदार दिलीप गांधी यांच्या उमेदवारीला मुंडे यांचा विरोध असल्याची भाजप पदाधिकार्‍यांमध्येच चर्चा आहे. मुंडे यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे या चर्चेला बळकटी मिळत आहे. या दोन्ही नेत्यांच्या दौर्‍याअभावी राजीव राजळे व दिलीप गांधी यांच्या चिंतेत भर पडली आहे.