आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडण करून वाहिली युवकांनी गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामखेड/पाथर्डी- केंद्रीय ग्रामविकासमंत्री, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या दशक्रिया विधी कार्यक्रमानिमित्त वंजारवाडी (ता. जामखेड) व निपाणी जळगाव (ता. पाथर्डी) येथे कार्यकर्त्यांनी मुंडण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. वंजारवाडी येथे खैरी नदीकाठावर मुंडे यांचा प्रतिदशक्रिया विधी करण्यात आला. यावेळी सुमारे 100 शंभर कार्यकर्त्यांनी मुंडण करून घेतले. यावेळी सभापती भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, सभापती डॉ. भगवान मुरूमकर, तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष वैजीनाथ लोंढे, संजय गोपाळघरे, केशव वनवे, संतोष गंभिरे, बाजीराव गोपळघरे, लालासाहेब गोपाळघरे, रावसाहेब खोत, भिवा खोत आदींसह पाच हजार कार्यकर्ते उपस्थित होते.
पाथर्डी तालुक्यातील निपाणी जळगाव येथील सोळा युवकांनी मुंडण केले, तर गावातील महिलांनी वटसावित्रीची पूजा केली नाही. मुंडे यांच्या दशक्रिया विधीनिमित्त सचिन खेडेकर, गणेश चौधर, अशोक बांगर, आशिष चौधर, कालिदास चौधर, बाळू नाकाडे, शरद खेडकर, अमोल नाकाडे, जनार्दन शिरसाठ, राहुल खेडकर, नीलेश बडे, अविनाश चौधर, किरण गिते, नारायण गिते, नामदेव चौधर, अनिल नाकाडे या युवकांनी सामूहिक मुंडण करून मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली.